तीन आरोपींवर गुन्हा
मानोरा,
Raids on liquor shops होळी सणाच्या पार्श्वभूमीवर पोलिस स्टेशन मानोरा अंतर्गत साखरडोह येथे २५ फेब्रुवारी रोजी गावठी हातभट्टी दारूविरोधात विशेष मोहीम राबविण्यात आली. या मोहिमेदरम्यान मानोरा पोलिसांनी तीन वेगवेगळ्या ठिकाणी धाड दारूबंदी टाकून कायद्यानुसार कारवाई केली. या कारवाईत एकूण १ लाख ६५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. याप्रकरणी तीन आरोपींवर दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
Raids on liquor shops पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लक्ष्मी दत्ता गिरडकर (वय ४५) यांच्याकडून २० हजार रुपये किमतीचा २०० लिटर मोहामाच, ७ हजार रुपये किमतीची ७० लिटर गावठी दारू तसेच ३ हजार ५०० रुपये किमतीचे दारू गाळप साहित्य असा एकूण ३० हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. तसेच आरोपी प्रदीप पांडुरंग खुळे (वय ४०) यांच्याकडून ४० हजार रुपये किमतीचा ४०० लिटर सडवा मोहामाच, १५ हजार रुपये किमतीची १५० लिटर गावठी दारू आणि ४ हजार ५०० रुपये किमतीचे दारू गाळप साहित्य असा एकूण ५९ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. याशिवाय आरोपी रेणुका तुकाराम राठोड (वय ५०) यांच्याकडून ६० हजार रुपये किमतीचा ६०० लिटर सडवा मोहामाच, १० हजार रुपये किमतीची १०० लिटर गावठी दारू तसेच ५ हजार ५०० रुपये किमतीचे दारू गाळप साहित्य असा एकूण ७५ हजार ५०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.
दरम्यान, जप्त करण्यात आलेला सडवा मोहामाच पंचासमक्ष जागेवरच नष्ट करण्यात आला. ही कारवाई ठाणेदार नैना पोहेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस जमादार सुनील नेमाने, राधेश्याम महले व सुनील राऊत यांनी पार पाडली. होळी सणादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिस प्रशासन सतर्क असून, Raids on liquor shops अवैध व्यवसायाविरोधातील कारवाई पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी सांगितले.