नागपूर,
Ramakrishna Wagh College छत्रपती शाहू महाराज शिक्षण संस्थेद्वारा संचालित रामकृष्ण वाघ कॉलेज ऑफ आर्ट्स अँड कॉमर्स येथे क्रांतिकारक, समाजसुधारक विनायक दामोदर सावरकर यांच्या पुण्यतिथीनिमित्त प्रतिमेला विनम्र अभिवादन करण्यात आले.कार्यक्रमाची सुरुवात महाराष्ट्र गीताने करण्यात आली. माता सरस्वती व स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून कार्यक्रमास प्रारंभ झाला. व्यासपीठावर प्रभारी प्राचार्य प्रा. पंकज झगडे, सर्व शाखांचे विभाग प्रमुख प्रा. दीपक ठाकरे, कला शाखा विभाग प्रमुख प्रा. सायली लाखे पिदळी, विज्ञान शाखा विभाग प्रमुख प्रा. स्वाती इंगळे व सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. हर्षल रोठे उपस्थित होते.
संगीत विभाग प्रमुख प्रा. सचिन देशमुख यांनी सावरकरांच्या जीवनावर आधारित गीत सादर केले. सावरकरांचे स्वातंत्र्यलढ्यातील योगदान, लेखन व विचारसरणी आजही समाजाला प्रेरणा देणारी आहे, Ramakrishna Wagh College असे मत प्रा. सायली लाखे पिदळी यांनी व्यक्त केले. राष्ट्रभक्ती, स्वाभिमान व निर्भीड विचारांची शिकवण सावरकरांनी दिली, असे प्रा. सुषमा वडस्कर यांनी प्रास्ताविकेत नमूद केले.कार्यक्रमास संस्थेचे संस्थापक सचिव प्रा. डॉ. मारोती वाघ तसेच संचालिका प्राचार्या लता वाघ यांचे मार्गदर्शन लाभले. सूत्रसंचालन प्रा. हर्षल रोठे यांनी केले तर आभार प्रा. संजय पाठक यांनी मानले. राष्ट्रगीताने कार्यक्रमाची सांगता झाली.
सौजन्य:प्रा. सायली लाखे पिदळी,संपर्क मित्र