शिरूर,
Nitin Chavan शिरूर तालुक्यातील सविंदणे येथे मंगळवारी सायंकाळी क्रीडा शिक्षक नितीन चव्हाण यांच्यावर झालेल्या अमानुष मारहाणीच्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. शिक्षकांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा चर्चेच्या केंद्रस्थानी आला असून, विद्यार्थ्यांच्या तीव्र निषेधामुळे गावात बुधवारी दिवसभर तणावाचे वातावरण निर्माण झाले.
घटनेनुसार, शिक्षक चव्हाण आपल्या घरात विश्रांती घेत असताना पंधरा ते वीस जणांचा टोळका त्यांच्या घरात घुसला. या आरोपींनी शिक्षकांना जबरदस्तीने घरातून ओढत बाहेर काढले आणि काही अंतरावर नेले. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की, आरोपींनी शिक्षकांना गावातील भरचौकात आणून लाथाबुक्क्यांनी तसेच काठ्या-दांडक्यांनी बेदम मारहाण केली. काही आरोपींच्या हातात कोयते असल्याचेही सांगितले जाते, ज्यामुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले.
घटनेनंतर जखमी Nitin Chavan शिक्षकांना स्थानिकांच्या मदतीने उपचारासाठी नेण्यात आले. या प्रकारामुळे विद्यार्थ्यांमध्ये संताप उसळला आणि बुधवारी सकाळपासूनच शाळेच्या समोर ठिय्या आंदोलन सुरू झाले. विद्यार्थ्यांनी फलक हातात घेऊन “आमच्या शिक्षकांना न्याय द्या” आणि “दोषींना अटक करा” अशा घोषणा दिल्या. अनेक विद्यार्थ्यांच्या डोळ्यांत अश्रू होते, तर काहींनी शिक्षकांवर झालेल्या हल्ल्याचा निषेध करत शाळांमधील सुरक्षेबाबत प्रश्न उपस्थित केला.घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलीस निरीक्षक संदेश केंजळे यांनी आंदोलनकर्त्यांशी संवाद साधत दोषींविरुद्ध सखोल चौकशी करून कठोर कारवाई करण्याचे आश्वासन दिले. विद्यार्थ्यांनी आणि ग्रामस्थांनी आरोपींना तात्काळ अटक करून कठोर कलमांखाली गुन्हा दाखल करण्याची मागणी केली. सुमारे चार तास चाललेल्या आंदोलनानंतर पोलीस आश्वासन देत आंदोलन स्थगित करावे लागले, मात्र विद्यार्थ्यांनी इशारा दिला की “कारवाई दिसली नाही तर पुन्हा आंदोलन करणार आहोत.”दरम्यान, रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असल्याचे पोलीसांनी सांगितले. या घटनेमुळे सविंदणे परिसरात भीती व अस्वस्थता निर्माण झाली Nitin Chavan असून, शिक्षकांच्या सुरक्षेबाबत गंभीर चर्चा सुरू झाली आहे. शैक्षणिक वातावरण बिघडवणाऱ्या अशा घटनांवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी सर्व स्तरांतून होत आहे.