स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिदिन अभिवादन सोहळा
बुलढाणा,
Swatantryaveer Savarkar स्वांतत्र्यवीर विनायक दामोधर सावरकर प्रखर राष्ट्रभक्त थोर स्वातंत्र्य सेनानी होते. भारतीय स्वातंत्र्य देवतेच्या चरणी त्यांनी आपले संपूर्ण जीवन समर्पित केले. सशस्त्र भारतीय क्रांतीकारकांचे मार्गदशक, प्रेरणा स्थान होते. महाविद्यालयीन जीवनात स्वदेशी चळवळ उभी करण्यात त्यांचा सिंहाचा वाटा होता. त्याग, समर्पण, धाडस, शौर्य, निर्भयता, प्रखर राष्ट्राभिमान, राष्ट्र निष्ठा, सेवाभाव, समर्पण वृत्ती या गुणांचे स्वातंत्र्यवीर सावरकर धनी होते. वर्तमान काळात स्वदेशी जीवन शैलीचा स्वीकार कर्तव्यदक्ष जागृत भारतीय नागरीक होवून राष्ट्रीय, धार्मीक एकात्मतेचा भाव ठेवून नित्य प्रवास करण्याचा दृढ संकल्प करावा, हेच खरे स्वातंत्र्यवीर सावकरांना अभिवादन ठरेल असे प्रतिपादन संस्कृत भारती, बुलढाणा विभाग संयोजक प्रा. विजय जोशी यांनी केले.
शहरातील डॉ. पंजाबराव देशमुख कृषी तंत्र विद्यालयात दि. २६ फेब्रुवारी रोजी आयोजित Swatantryaveer Savarkar स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृतिदीनी अभिवादन सोहळा प्रसंगी प्रमुख वक्ते म्हणुन विद्यार्थ्यांना मागदर्शन करीत होते. याप्रसंगी व्यासपीठावर प्राचार्य डॉ. जाधव, स्वदेशी जागरण मंचाचे विदर्भ प्रांत संयोजक शिवाजी भालतिलक उपस्थित होते. अभिवादन सोहळा प्रसंगी कृषी तंत्र विद्यालयाचे बागुलकर, काळे, मानापुरे व सर्व विद्यार्थी, विद्यार्थीनी उपस्थित होते. प्रास्ताविक परिचय आभार शिवाजी भालतिलक यांनी केले.