अवकाळी पाऊस, गारपिटीने रबी पिकांचे नुकसान

    दिनांक :27-Feb-2026
Total Views |
हेक्टरी ५० हजारांच्या मदतीची काँग्रेसची मागणी

उमरखेड, 
तालुक्यात २३ ते २५ फेब्रुवारीदरम्यान झालेल्या Unseasonal rains अवकाळी पाऊस व गारपिटीमुळे रबी हंगामातील पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. उभी अक्षरशः जमिनीवर कोसळून शेतकर्‍यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला आहे. या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांकडे उमरखेड उपविभागीय अधिकार्‍यांमार्फत, २७ फेब्रुवारीला निवेदन देत तत्काळ पंचनामे करून शेतकर्‍यांना हेक्टरी ५० हजार रुपयांची मदत देण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
 
 
magani
 
उमरखेड तालुक्यातील विविध भागांत अवकाळी पावसासोबत जोरदार वारे व गारपीट झाली. त्यामुळे गहू, हरभरा, ज्वारी, केळी, फळबाग तसेच भाजीपाला पिकांचे मोठे नुकसान झाले. विशेषतः जंगल भागातील इसापूर, निंगणूर, खरबी आदी गावांमध्ये गारपिटीने पिके अक्षरशः मातीत मिसळल्याचे नमूद करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे मुळावा, पोफाळी, मतखंड भागात अवकाळीच्या थैमानाने शेतकर्‍यांचे मोठे आर्थिक नुकसान झाल्याचे पुढे आले आहे.
 
 
Unseasonal rains  शेतकर्‍यांचे उभे पीक पूर्णपणे आडवे पडल्याने उत्पादनात मोठी घट असून आर्थिक संकट अधिक गडद झाले आहे. त्यामुळे शासनाने तत्काळ सर्वेक्षण करून पंचनामे करावेत व बाधित शेतकर्‍यांना हेक्टरी ५०,००० रुपयांची मदत तात्काळ जाहीर करावी, अशी ठाम मागणी, काँग्रेसच्या वतीने करण्यात आली आहे. तसेच, मागील पावसाळ्यातील पूर व अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीचे सानुग‘ह अनुदान व पीकविमा अद्यापही अनेक शेतकर्‍यांना मिळाले नसल्याने तत्काळ शासनाने द्यावी, अशी मागणी काँग‘ेसचे तालुकाध्यक्ष दत्तराव शिंदे यांच्या नेतृत्वात गेलेल्या शिष्टमंडळाने केली आहे.
 
 
Unseasonal rains  शासनाने विलंब न करता प्रलंबित मदत तातडीने वितरित करून शेतकर्‍यांना न्याय द्यावा, अशी विनंती करण्यात आली आहे. या निवेदनाच्या प्रती खासदार नागेश आष्टीकर, यवतमाळचे पालकमंत्री संजय राठोड व उमरखेडचे आमदार किसन वानखेडे यांनाही देण्यात आहेत. या निवेदनावर शेकडो शेतकर्‍यांच्या सह्या आहेत. हे निवेदन देताना युवक काँग्रेसचे विधानसभा अध्यक्ष इम्रान  पठाण, प्रभाकर कदम, गौतम दवणे, गजानन भारती हे पदाधिकारी व शेतकरी मोठ्या सं‘येने उपस्थित होते. दरम्यान, तालुक्यातील शेतकरी वर्गात प्रचंड चिंतेचे वातावरण असून शासनाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.