वन्यजीव रक्षक आणि सर्पमित्रांना शासकीय समित्यांमध्ये द्या

    दिनांक :27-Feb-2026
Total Views |
नागपूर, 
Vanyajiv rakṣhak and sarpmitra मानव-वन्यजीव संघर्ष कमी करणे आणि वन्यजीवांचे संरक्षण व संवर्धन अधिक प्रभावीपणे कार्य करणार्‍या वन्यजीव रक्षक आणि सर्पमित्रांना शासकीय समित्यांमध्ये प्राधान्य देण्याची मागणी वर्ल्ड फॉर नेचर या संस्थेने केली आहे. शासन स्तरावर विविध उपाययोजना राबवूनही मानव-वन्यजीव संघर्ष नियंत्रणात आलेला नाही. वन्यजीव संरक्षण आणि पर्यावरण संवर्धनासाठी लाखो निधी खर्च केल्या जात असताना अपेक्षित यश मिळत नसल्याचे चित्र आहे.
 

sarp mitra 
 
Vanyajiv rakṣhak and sarpmitra या पार्श्वभूमीवर स्थानिक पातळीवर जीव धोक्यात घालून कार्य करणार्‍या वन्यजीव रक्षक आणि सर्पमित्रांच्या कार्याचे महत्त्व ओळखून त्यांना शासकीय समित्यांमध्ये प्राधान्य देण्याची मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ तसेच वन व महसूल विभागाच्या निर्णयानुसार तालुकास्तरावर स्थापन करण्यात आलेल्या समित्यांमध्ये अशासकीय सदस्य म्हणून प्रत्यक्ष कार्य करणार्‍या सर्पमित्रांना नियुक्त करावे, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली आहे.