चामोर्शी,
‘Youth Festival-2026’ आजची पिढी ही खर्या अर्थाने ऊर्जावान आहे. युवामहोत्सव हे केवळ स्पर्धा करण्याचे ठिकाण नसून आपल्यातील सुप्त गुणांना वाव देणारे एक प्रभावी व्यासपीठ आहे. युवकांनी केवळ प्रमाणपत्र किंवा ट्रॉफी मिळवण्यावर लक्ष न देता, येथून एक सकारात्मक ऊर्जा घेऊन जावी, जी त्यांना भविष्यात यशस्वी होण्यासाठी मदत करेल, असे प्रतिपादन नगराध्यक्ष जयश्री वायलालवर यांनी युवा महोत्सवाच्या उदघाटक म्हणून मार्गदर्शन करतांना केले.
येथील कर्मवीर दादासाहेब देवतळे महाविद्यालयात ‘Youth Festival-2026’ ‘युवामहोत्सव-2026’ चा उद्घाटन सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव देण्यासाठी आणि त्यांच्यातील कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सांस्कृतिक व क्रीडा विभागाच्या वतीने या युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी श्री शिवाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष अनिल पाटील म्हशाखेत्री होते. तर प्रमुख अतिथी गोविंदराव बानबले, सेवानिवृत्त शारीरिक शिक्षण संचालक प्रा. संजय म्हस्के, ग्रंथालय विभाग प्रमुख डॉ. भुषण आंबेकर, सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा. रोशन गेडाम, क्रीडा विभाग प्रमुख प्रा. संकेत राऊत रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा. दिपक बाबनवाडे उपस्थित होते.
‘Youth Festival-2026’ यावेळी प्रा. संजय म्हस्के यांनी केवळ पुस्तकी ज्ञान मिळवणे म्हणजे शिक्षण नव्हे, तर व्यक्तिमत्व विकासासाठी सांस्कृतिक स्पर्धांमध्ये सहभाग घेणे काळाची गरज आहे. युवामहोत्सव हा विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेला दिलेली एक संधी आहे, असे प्रतिपादन केले. प्राचार्य डॉ. डी.जी. म्हशाखेत्री यांनी आपल्या प्रास्ताविकात विद्यार्थ्यांच्या अंगी असलेल्या सुप्त कलागुणांना हक्काचे व्यासपीठ मिळावे, त्यांच्यातील सर्जनशीलता फुलून यावी हाच या महोत्सवाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगीतले. यावेळी विद्यापीठ परीक्षा व स्पर्धामध्ये नावलौकिक करणार्या गुणवंत विद्यार्थ्यांना ग्रंथभेट व पुषगुच्छ देऊन मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन प्रा. वंदना थुटे यांनी तर आभार प्रा. मीनल गाजलवार यांनी मानले. यावेळी सोहळ्याला प्रा. डॉ. राजेंद्र झाडे, प्रा. अरुण कोडापे, प्रा. जयश्री बोबाटे, प्रा. डिंपल झाडे, प्रा. शुभांगी खोबे, प्रा. प्रमोद चापले, प्रा. संन्याशी मंडल, प्रा. शिखा मिस्त्री, प्रा. शीतल कंबलवार यासह स्वयंसेवक, सांस्कृतिक समिती सदस्य तथा विद्यार्थी उपस्थित होते.