हिंदू जनजागृती समितीचे निवेदन
सेलू,
महाराष्ट्रात हिंदू भगिनींच्या रक्षणासाठी उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडच्या धर्तीवर कठोर आणि अजामिनपात्र Love Jihad and Illegal Conversion लव्ह जिहाद व अवैध धर्मांतर विरोधी कायदा अधिवेशनात संमत करण्यात यावा या मागणीचे निवेदन हिंदू जनजागृती समितीच्या वतीने तहसीलदारांना दिले. निवेदनात नमुद केल्या नुसार दीड-दोन वर्षांपासून महाराष्ट्रात लव्ह जिहाद आणि अवैध धर्मांतर या गंभीर समस्यांविरोधात सकल हिंदू समाज, हिंदू जनजागृती समिती आणि विविध महिला संघटनांनी एकत्रित येत प्रचंड जनआक्रोश मोर्चे काढले. त्यावेळी सरकारने या विषयाचे गांभीर्य ओळखून लव्ह जिहाद विरोधात कठोर कायदा करण्याचे आश्वासन दिले होते. मात्र, आजही दुर्दैवाने या घटना थांबलेल्या नाहीत. उलट त्यांची तीव्रता आणि क्रूरता वाढतच चालली आहे.
Love Jihad and Illegal Conversion लव्ह जिहाद हे केवळ प्रेमाचे नाटक नसून ते एक संघटित, नियोजनबद्ध आणि वैचारिक युद्ध आहे. यामध्ये हिंदू मुलींना प्रेमाच्या जाळ्यात ओढणे, त्यांचे धर्मांतर करणे, लैंगिक शोषण करणे, दहशतवादासाठी वापरणे आणि विरोध केल्यास त्यांची निघृण हत्या करणे, असे प्रकार सर्रास घडत आहेत. महाराष्ट्रात हजारो हिंदू मुली लव्ह जिहादच्या बळी ठरत आहेत. त्यामुळे लव्ह जिहाद आणि धर्मातर विरोधी कायदा लागू करण्याची मागणी निवेदनातून करण्यात आली यावेळी हिंदू जनजागृती समितीच्या कांचन माहुरे, सविता भोंडे, चुडामन हांडे, मंदा मांजरीकर, मीना सावरकर, शुभांगी माहुरे, मंगला दंढारे, शिवा डुकरे, कृष्णा कावळे, प्रशांत देवतारे, आशिष मसराम, गणेश खोडके, गणेश कुकडे, उमाकांत टोळ, भारती बोकडे, कल्पना सूर्यवंशी आदी उपस्थित होते.