पंचपरिवर्तन म्हणजे रामराज्याचा राजमार्ग ! : प्रा. दिलीप जोशी

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
वाशीम, 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे शताब्दी वर्ष आहे. हे राष्ट्र परम् वैभवाला जावे आणि तेही याची देही याची डोळा पहावे अशी अपेक्षा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. हेडगेवारांनी व्यक्त केली होती. प्रत्येक स्वयंसेवकाची देखील हीच इच्छा असते. या देशात रामराज्य आलेले डोळ्यांनी पहावे ही सर्वांचीच आर्त भावना. संघाला आजपर्यंत व्यवस्था परिवर्तन त्यानंतर समाजपरिवर्तन करण्यात यश प्राप्त झाले असून, आता पंचपरिवर्तनावर संघ काम करतोय, असे प्रतिपादन विद्याचस्पती Prof. Dilip Joshi प्रा. दिलीप जोशी यांनी केले.
 
 
adksl
 
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधून संपूर्ण देशभर हिंदूसंमेलने आयोजित करण्यात येत आहेत. त्या अंतर्गतच वाशीम येथे आज, २८ फेब्रुवारी स्थानिक परशुराम भवन येथे विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन पार पडले. यावेळी प्रमुख वक्ते म्हणून प्रा. दिलीप जोशी बोलत होते. यावेळी व्यासपीठावर प्रमुख अतिथी म्हणून हभप श्रीहरी महाराज पितळे मेहकर, हभप रुख्मीणी शास्त्री, हभप गणेश महाराज हुंबाड महागाव रिसोड उपस्थित होते. तर प्रमुख वक्ते म्हणून Prof. Dilip Joshi  प्रा. दिलीप जोशी हे होते.
 
 
आता संघाला शंभर वर्ष पुर्ण होत आहेत. या शंभर वर्षात संघ सार्वभौम झाला, सर्वव्यापी झाला, सर्वस्पर्शी झाला आणि सर्वायामी झाला. संघविचार आचारासह घराघरात आणि मनामनात पोचला. संघाच्या शतकपुर्व वर्षीच्या विजयादशमी उत्सवात विद्यमान सरसंघचालक डॉ.मोहनजी भागवत यांनी सामाजिक समरसता, कुटुंब प्रबोधन, पर्यावरण संरक्षण, स्व चा बोध अर्थात स्वदेशी, नागरी कर्तव्ये ही पंचसुत्री मांडली. ही पंचसुत्री, पंचपरिवर्तन, पंचोपचार, पंचपदी केवळ स्वयंसेवकांसाठी नसुन भारतात राहणार्‍या नव्हे विश्वातील सर्वांसाठी उपयोगी,महत्वाची आणि गरजेची आहे. बारकाईने विचार केल्यास हा रामराज्याचा जाहीरनामा आहे.
 
 
रामराज्यात समाजात समरस भाव होता. रामराज्यात कुटुंबव्यवस्था मजबूत आणि बळकट होती,रामराज्यात सृष्टीचा विचार अग्रक्रमावर होता,रामराज्यात स्व चा भाव महत्वाचा होता. व्यापारउदिमात स्वराज्यातील तरुणाईला प्रोत्साहन असे.नितिमत्ता ,शुद्घचारित्र्य आणि समाजाप्रति कर्तव्यभाव असल्यामुळे सर्वत्र शांतता आणि सुव्यवस्था होती. कारागृह होते पण गुन्हेच घडत नसल्यामुळे बंदिशाळा ओस होत्या. रामराज्यात प्रजा राजा,राज्य यांच्यात प्रखर समन्वय आणि एकमेकांप्रति निष्ठा होती. हे राष्ट्र परम् वैभवाला नेण्यासाठी पंचसुत्री महत्वाची आहे. म्हणूनच सरसंघचालकांनी सांगितलेले पंचपरिवर्तन म्हणजे रामराज्याचा राजमार्गच आहे, असेही प्रा. दिलीप जोशी यावेळी बोलतांना म्हणाले. यावेळी हभप श्रीहरी महाराज पितळे, हभप रुख्मीणी शास्त्री, हभप गणेश महाराज हुंबाड यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे संचालन शशिकांत दंडवते यांनी केले. कार्यक्रमास महिला व पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.