फटाक्यांच्या कारखान्यात भीषण स्फोट; १८ जणांचा मृत्यू

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
आंध्र प्रदेश
fireworks factory explosion आंध्र प्रदेशमधील काकीनाडा जिल्हा येथे शनिवारी फटाके बनवणाऱ्या कारखान्यात झालेल्या भीषण स्फोटात किमान १८ जणांचा मृत्यू झाला असून सहा जण गंभीर जखमी झाले आहेत. या दुर्घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता प्रशासनाने व्यक्त केली आहे.
 

Andhra Pradesh, Kakinada district, fireworks factory explosion 
वंगालापुडी अनीता fireworks factory explosion यांनी या घटनेची माहिती देताना सांगितले की, स्फोट अत्यंत तीव्र होता आणि अनेक कामगार गंभीर अवस्थेत रुग्णालयात दाखल आहेत. प्राथमिक माहितीनुसार, स्फोटाच्या वेळी कारखान्यात सुमारे २० कामगार कार्यरत होते. बचाव पथकांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली असून ढिगाऱ्याखाली अडकलेल्यांचा शोध सुरू आहे.दरम्यान, जिल्हाधिकारी आणि जिल्हा दंडाधिकारी सगीली शान मोहन यांनी सांगितले की, जखमींपैकी काहींची प्रकृती चिंताजनक आहे. प्रशासनाने जखमींवर तातडीने उपचार सुरू केले असून आवश्यक ती वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात येत आहे.या दुर्घटनेबद्दल एन चंद्रबाबू नायडू यांनी तीव्र दुःख व्यक्त केले आहे. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर शोक व्यक्त करत संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा केली असून पीडितांना तातडीने मदत करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच वरिष्ठ अधिकारी आणि मंत्र्यांना घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेण्यास सांगितले आहे. बचावकार्यावर सरकारकडून बारकाईने लक्ष ठेवले जात असून बाधित कुटुंबांना सर्वतोपरी मदत केली जाईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.