नागपूर,
Balance of tradition कृषी संस्कृतीतील सण हे निसर्गाशी जोडलेले आनंदोत्सव असून ते ऋतुचक्र आणि मानवी जीवनाशी संबंधित आहेत. वसंतऋतूच्या आगमनाचा सण हा नवचैतन्याचा संदेश देणारा असला तरी काही ठिकाणी शुभ-अशुभाच्या संकल्पनांमुळे भीतीचे वातावरण निर्माण होत असल्याची खंत व्यक्त केली जात आहे.
राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनीही शुभ-अशुभाच्या कल्पनांवर भाष्य करत समाजमनातील भीती दूर करण्याचा संदेश दिला आहे. दरम्यान, अमरावती येथील अंबादेवी मंदिर परिसरात होळी निमित्त सजावट करण्यात आली होती. Balance of tradition मात्र होळीत साखरेच्या गाठी अर्पण केल्या जात असल्याने त्या गरजूंपर्यंत पोहोचविल्या असत्या तर अधिक उपयुक्त ठरले असते, असा प्रश्न उपस्थित होत आहे. सण साजरे करताना परंपरेसोबत वैज्ञानिक दृष्टी आणि सामाजिक भान राखण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले जात आहे.
सौजन्य: ज्ञानेश्वर रक्षक, संपर्क मित्र