मुंबई,
Bigg Boss Marathi च्या घरात दर आठवड्याला नवनवीन वाद, चर्चा आणि ट्विस्ट पाहायला मिळतात. त्यामुळेच प्रेक्षक आतुरतेने ‘भाऊचा धक्का’ची वाट पाहत असतात. या सीझनमध्ये भाऊच्या भूमिकेत असलेले Riteish Deshmukh कोणाची शाळा घेणार, याकडे सर्वांचे लक्ष लागलेले असते.
घरात आयुष आणि तन्वी यांच्या मैत्रीबाबत आधीपासूनच चर्चा रंगत होत्या. रुचिताने काही दिवसांपूर्वी दोघं लव्ह अॅंगल तयार करण्याचा प्रयत्न करत आहेत, असं वक्तव्य केलं होतं. मात्र आयुषने घराबाहेर आल्यानंतर प्राजक्ता, करण, सचिन आणि ओमकार हे आयुष्यभरासाठी कमावलेले मित्र असल्याचं सांगितलं होतं.
या आठवड्यात Bigg Boss Marathi मात्र हा विषय पुन्हा ऐरणीवर आला. राखीने आयुष हा तन्वीचा बॉयफ्रेंड असल्याचं वक्तव्य केल्यानंतर तन्वी संतापली आणि दोघींमध्ये जोरदार वाद झाला. नुकत्याच शेअर झालेल्या प्रोमोमध्ये रितेश भाऊ तन्वीला तिची चूक समजावताना दिसतात. एका वक्तव्यावरून एवढा मोठा गदारोळ करण्याची गरज नव्हती, असा सल्ला देत त्यांनी तिला आरसा दाखवला.भाऊच्या धक्क्यावर रितेश म्हणाले, “तन्वी कोलते जी इतका मोठा मुद्दा उभा करते की इतरांना कंटाळा येतो. तुम्ही नेहमी थेट उत्तर देत नाही, फक्त प्रतिक्रिया देत राहता. राखी यांनी सांगितलं की आयुष तुमचा बॉयफ्रेंड आहे… यावर तुम्ही लगेच चिडलात, मोठ्या आवाजात ओरडलात. त्यामुळे प्रेक्षकांना त्रास झाला.”रितेश भाऊंनी चुका दाखवून दिल्यानंतर तन्वीचे डोळे पाणावल्याचे प्रोमोमध्ये दिसते. या प्रोमोवर नेटकऱ्यांनी भरभरून प्रतिक्रिया दिल्या आहेत. “मस्त बोललात भाऊ”, “तन्वी Dominating वागलीये, बरं झालं बोललात”, “खरंच खूप जोरात ओरडते, गरजेचं होतं” अशा कमेंट्सचा पाऊस पडत आहे.आता येत्या भागात तन्वी या टीकेनंतर स्वतःमध्ये बदल करते का, आणि घरातील समीकरणे कशी बदलतात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे.