चैतन्यबापू देशमुख भाजपा प्रदेश उपाध्यक्षपदी

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
तभा वृत्तसेवा
हदगाव, 
chaitanyabapu deshmukh नांदेड येथे आयोजित कार्यक्रमात भारतीय जनता पार्टी यांच्या वतीने जाहीर करण्यात आलेल्या नव्या प्रदेश कार्यकारिणीत हदगाव तालुक्याचे सुपुत्र चैतन्यबापू देशमुख यांची प्रदेश उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली. या निवडीबद्दल नांदेड येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
 
 
चैतन्य बापू
 
 
पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी व आगामी काळातील राजकीय आव्हानांना सक्षमपणे सामोरे जाण्यासाठी भाजपाकडून विविध पदांची घोषणा करण्यात आली असून, त्यामध्ये चैतन्यबापू देशमुख यांची प्रदेश उपाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली आहे.chaitanyabapu deshmukh या प्रसंगी हदगाव भाजपा मंडळ अध्यक्ष बालाजी कदम, पश्चिम मंडळ तालुकाध्यक्ष सुर्यकांत हनवते, भाजपा ओबीसी आघाडीचे जिल्हा उपाध्यक्ष बापुराव घारके व माजी तालुका सरचिटणीस उमाकांत भोरेे उपस्थित होते. सर्व मान्यवरांनी चैतन्यबापू देशमुख यांचा पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला व त्यांच्या पुढील कार्यासाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या.
----