आठव्या मजल्यावरून सहा कामगार कोसळले

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
मुंबई
Chembur construction accident, मुंबईच्या चेंबूर परिसरातून धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुभाष नगर भागात एका निर्माणाधीन इमारतीच्या आठव्या मजल्यावर काम करत असताना सहा कामगार अचानक खाली कोसळले. या भीषण अपघातामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली असून, बांधकाम क्षेत्रातील कामगारांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा उघडकीस आला आहे.
 

Chembur construction accident, 
प्राथमिक माहितीनुसार, सुभाष नगर येथील या उंच इमारतीचे बांधकाम वेगाने सुरू होते. शनिवारी सकाळी कामगार स्लॅब किंवा प्लास्टरचे काम करत होते. अचानक त्यांच्या तोलावर नियंत्रण न राहिल्यामुळे सहा कामगार ८०–९० फूट उंचीवरून खाली कोसळले.अपघातातील धक्कादायक बाब म्हणजे, या सर्व कामगारांनी उंचीवर काम करताना कोणताही सुरक्षा उपकरण (हेल्मेट, सेफ्टी बेल्ट किंवा नेट) वापरलेले नव्हते. नियमानुसार, उंच इमारतीवर काम करताना ही उपकरणे अनिवार्य असतात. घटनेवरून असे दिसून येते की, सुरक्षेच्या नियमांचे उल्लंघन मोठ्या प्रमाणावर झाले होते. कामगारांनी सेफ्टी बेल्ट लावले असते तर कदाचित ही घटना टळू शकली असती, अशी चर्चाही घटनास्थळी सुरु आहे.अपघातानंतर सहकाऱ्यांनी आणि स्थानिक नागरिकांनी तातडीने मदतीसाठी धाव घेतली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या सहा कामगारांना घाटकोपर येथील राजावाडी रुग्णालय हलवण्यात आले. डॉक्टरांच्या माहितीनुसार काही कामगारांची प्रकृती अत्यंत गंभीर असून त्यांना आयसीयूमध्ये ठेवण्यात आले आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा सुरू केला आहे. स्थानिक प्रशासन आणि फायर ब्रिगेडसह बचावकार्य सुरु असून अपघाताचे कारण आणि सुरक्षेतील उल्लंघन यावर तपास सुरू आहे.