यवतमाळ,
राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त Child scientists बालवैज्ञानिकांनी प्रदर्शन भरवून विविध वैज्ञानिक प्रकल्प आणि नवनवीन प्रयोग सादर केले. स्काय इंटरनॅशनल स्कूलमध्ये आयोजित या विज्ञान प्रदर्शनाचे उद्घाटन वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. प्रमोद यादगिरवार व प्राचार्य डॉ. सुप्रभा यादगिरवार यांनी केले. शाळेचे व्यवस्थापक यश डांगे आणि मु‘याध्यापक कृष्णकुमार यावेळी उपस्थित होते.
विज्ञान प्रदर्शनांत Child scientists बाल वैज्ञानिकांनी पर्यावरण पूरक तंत्रज्ञान, सौरऊर्जा आणि जीवनातील वैज्ञानिक संकल्पनांवर आधारित प्रकल्प मांडून वैज्ञानिक दृष्टीकोन सादर केला. कचरा व्यवस्थापन, नैसर्गिक शेती, जलशुद्धीकरण, प्रकाशाचे विकिरण, अँटी स्लिप अलार्म या विषयावर छोटे प्रयोग लक्षवेधी ठरले.