हदगाव तालुक्यात वानरे-रानडुकरांचा उच्छाद,

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
सात दिवसांत बंदोबस्त न झाल्यास उपोषण

हदगाव, 
Hadgaon: Monkeys-wild boars हदगाव तालुक्यातील रुई जिल्हा परिषद गटातील अनेक गावांमध्ये वानरे, रानडुकर व रोही या वन्यप्राण्यांचा उपद्रव मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतपिकांचे मोठे होत आहे. त्यामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग‘ेसचे तालुकाध्यक्ष, अ. भा. सरपंच परिषदेचे तालुकाध्यक्ष, ग‘ामपंचायत कई (धा) चे सरपंच व संजय गांधी निराधार अनुदान समितीचे सदस्य अमोल कदम यांनी वनपरिक्षेत्र अधिकार्‍यांना निवेदन सादर केले आहे. निवेदनात नमूद आहे की, हदगाव तालुक्यातील रुई जिल्हा गटात वन्यप्राण्यांचे वास्तव्य मोठ्या प्रमाणात वाढले असून वानरे, रानडुकरे व रोही यांच्यामुळे ऊस व इतर शेतीपिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे.
 
 
vanar
 
Hadgaon: Monkeys-wild boars विशेषतः ई धानोरा, करोडी, काळेश्वर, उंचेगाव, शिवपुरी, आडा, अंबाळा, हस्तरा, बोरगाव, भानेगाव, वाकोडा, बेलगव्हाण, हरडफ, हडसणी, फळी, वाटेगाव, बनचिंचोली, बाभळी, वेलमंडळ, गुरफळी, नवी गुरफळी, गोर्लेगाव व कोथळा या वानरांचा त्रास मोठ्या प्रमाणात असल्याचे निवेदनात नमूद आहे. या उपद्रवामुळे लहान मुले, वृद्ध व महिलांमध्ये भीतीचे वातावरण असून नागरिकांचे दैनंदिन जीवन विस्कळीत झाले आहे. त्यामुळे तत्काळ वन्यप्राण्यांचा बंदोबस्त करण्यात यावा, अशी मागणी निवेदनातून करण्यात आली आहे. तसेच महाराष्ट्र शासनाने वानर पकडण्याबाबत शासन निर्णय काढलेला असून त्यानुसार समाधान गिरी या नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे वनपरिक्षेत्र कार्यालयाने तत्काळ कार्यवाही करून वानरे व रानडुकरांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी करण्यात आली आहे. येत्या सात दिवसांत संबंधित प्राण्यांचा बंदोबस्त न झाल्यास तहसील कार्यालयासमोर उपोषण करण्याचा इशाराही देण्यात आला आहे.