होळीच्या पार्श्वभूमीवर विशेष रेल्वे गाड्यांची भेट

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
चर्लपल्ली-दानापूर दरम्यान 12 फेर्‍या
गोंदिया स्थानकाला थेट लाभ

गोंदिया,
Holi Special train होळी सणाच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेऊन भारतीय रेल्वे प्रशासनाने देशभरात तब्बल 1,410 हून अधिक होळी विशेष गाड्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. यामध्ये दक्षिण पूर्व मध्य रेल्वेकडून 15 विशेष गाड्यांचे नियोजन करण्यात आले असून, चर्लपल्ली-दानापूर मार्गावर तीन विशेष गाड्यांच्या माध्यमाने 12 फेर्‍या धावणार आहेत. या गाड्या नागपूर रेल्वे मंडळातून मार्गक्रमण करणार असल्याने गोंदिया जिल्ह्यातील प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि तेलंगणा या राज्यांदरम्यान होळीच्या काळात होणारी प्रचंड प्रवासी गर्दी लक्षात घेऊन ही विशेष व्यवस्था करण्यात आली आहे. प्रत्येक विशेष गाडीत 24 डबे असणार आहेत.
 
 
holi
 
Holi Special train यात गाडी क्रमांक 07091 चर्लपल्लीहून 23, 28 फेब्रुवारी तसेच 3 व 7 मार्च रोजी धावेल. गाडी क्रमांक 202607092 दानापूरहून 25 फेब्रुवारी, 1, 5 व 9 मार्च रोजी चालेल. गाडी क्रमांक 07093 चर्लपल्लीहून 28 फेब्रुवारी तर गाडी क्रमांक 07094 दानापूरहून 2 मार्च गाडी क्रमांक 07095 चर्लपल्लीहून 1 मार्च रोजी दानापूरहून 3 मार्च रोजी परीचलन करण्यात येईल. गाडी क्रमांक 07091/07093/07095 चर्लपल्लीहून दुपारी 1 वाजता रवाना होईल. गोंदिया येथे रात्री 11.45 तर बालाघाट रात्री 1.40, नैनपुर रात्री 2.20, जबलपुर पहाटे 6 वाजता, सतना सकाळी 11 वाजता, मणिकपुरी दुपारी 2 वाजता, प्रयागराज छिवकी संध्याकाळी 4.30 वाजता, दानापुर रात्री 11.55 वाजता पोहचेल. गाडी क्रमांक 07092/07094/07096 दानापुर येथून दुपारी 3 वाजता सुटेल. प्रयागराज छिवकी रात्री 10.30 वाजता, मणिकपुरीत दुपारी 1.20, सतना दुपारी 2.30, जबलपुर संध्याकाळी 5.30 वाजता, नैनपुर रात्री 8.40 वाजता, बालाघाट रात्री 10.08 वाजता, गोंदिया येथे रात्री 11.05 वाजता पाहचेल. दूसर्‍या दिवसी चर्लपल्ली येथे सकाळी 10 वाजता पोहचेल. रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अधिकृत संकेतस्थळ अथवा आरक्षण काउंटरमार्फत तिकीट आरक्षित करण्याचे आवाहन केले आहे. होळीच्या पार्श्वभूमीवर ही विशेष सोय उपलब्ध करून देण्यात आल्याने गोंदिया व परिसरातील प्रवाशांना सुरक्षित, सुकर व आरामदायी प्रवासाचा पर्याय उपलब्ध झाला आहे.