बिबट्याच्या हल्ल्यातील जखमींची भाजपा पदाधिकार्‍यांनी घेतली भेट

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
कुरखेडा, 
तालुका मुख्यालयापासून अगदी दोन कीलोमीटर अंतरावर असलेल्या धमदीटोला शेतशिवारात मका पिकात दडून असलेल्या बिबट या हिंस्त्र वन्यप्राण्याला हूसकावून लावताना Leopard attack बिबट्याने प्रतिहल्ला केल्याने दोन इसम जखमी झाल्याची घटना 22 फेब्रुवारी रोजी सकाळच्या सुमारास घडली. कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयात भरती असलेल्या या जखमी रुग्णांची भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष माजी पंचायत समिती सदस्य चांगदेव फाये, आरोग्य व स्वच्छता सभापती सागर निरंकारी, सेवानिवृत्त मुख्याध्यापक भाजपचे आदिवासी नेते कृष्णा चंद्रमा, शहर महामंत्री मंगेश मांडवे आदी पदाधिकांनी भेट घेतली व आरोग्याची विचारपूस केली.
 
 
bittya
 
Leopard attack यावेळी वनविभागाच्या अधिकार्‍यांसोबत संपर्क साधून जखमी व्यक्तींना व जनावरांचे नुकसान झालेल्या शेतकर्‍यांना त्वरित आर्थिक मदत देण्यात यावी व त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे तालुकाध्यक्ष चांगदेव फाये, आरोग्य व स्वच्छता सभापती सागर निरंकारी, कृष्णाजी चंद्रमा, मंगेश मांडवे व उपस्थित पदाधिकार्‍यांनी केली आहे. यावेळी जखमींचे कुटुंबीय नातेवाईक उपस्थित होते.