मधमाशांच्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
कारंजा लाड, 
मानोरा तालुयातील इंझोरी परिसरात शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी दुपारी सुमारे २ वाजताच्या सुमारास Madhamasha attacks मधमाशांच्या अचानक झालेल्या हल्ल्यात दोन शेतकरी जखमी झाल्याची घटना घडली. शेतात नियमित काम सुरू असताना मधमाशांचा थवा संतप्त होऊन दोघांवर तुटून पडल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. जखमींमध्ये नारायण गावंडे (वय ४८ ) व प्रवीण गावंडे (वय ३६ ) दोघेही राहणार इंझोरी यांचा समावेश आहे.
 
 
Madhamasha
 
दोघेही शेतात मशागत व इतर कामात व्यस्त असताना जवळील झाडावर असलेल्या Madhamasha attacks  मधमाशांनी त्यांच्यावर हल्ला चढविला. अचानक झालेल्या हल्ल्यामुळे दोघांनाही अंगावर व चेहर्‍यावर अनेक ठिकाणी दंश झाले.घटनेची माहिती मिळताच सास कर्तव्य सेवक अजय ढोक यांनी तत्परता दाखवत जखमींना खासगी वाहनाने तातडीने कारंजा उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. तेथे वैद्यकीय अधिकार्‍यांनी प्राथमिक उपचार करून पुढील उपचार सुरू केले आहेत. दोघांची प्रकृती सध्या स्थिर असल्याचे रुग्णालय प्रशासनाकडून सांगण्यात आले.या घटनेमुळे परिसरातील शेतकर्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, शेतात काम करताना आवश्यक ती खबरदारी घेण्याची गरज व्यक्त होत आहे. विशेषतः झाडांवर मधमाशांची पोळी असल्यास ती सुरक्षितरीत्या हटविणे, मोठा आवाज टाळणे तसेच संरक्षणात्मक कपड्यांचा वापर करणे आवश्यक आहे.ग्रामीण भागात अशा घटना वारंवार घडत असल्याने संबंधित विभागांनी जनजागृती मोहीम राबवून शेतकर्‍यांना मार्गदर्शन करावे, अशी मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे.