महागाव नपं अध्यक्षपदी रंजना आडे

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
राजकीय कुरघोडीत भाजपा वरचढ
काँग्रेसच्या नगरसेवकांनी झुगारला व्हिप

महागाव, 
Mahagaon Nagar Panchayat President: Ranjana Ade महागाव नगर पंचायत अध्यक्षपदी शनिवार, २८ फेब्रुवारी रोजी रंजना दीपक आडे यांची बहुमताने निवड करण्यात आली असून काँग्रेसकडून अध्यक्षपदासाठी रूपाली संतोष कोळेकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. परंतु त्यांना केवळ ५ मते मिळून त्यांचा पराभव झाला. महागाव नपंमध्ये मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या राजकीय घडामोडींना अखेर ब‘ेक लागला असून काँग्रेसप्रणित अपक्ष नगरसेवक असलेल्या नपं अध्यक्ष दिलीप कोपरकर यांच्यावरील अविश्वास ठराव पारित करण्यासाठी काँग्रेसच्याच नगरसेवकांनी पक्षाचा व्हिप झुगारला होता.
 
ranjana
 
याच बंडखोर काँग्रेस नगरसेवक आणि शिवसेना नगरसेवकांच्या साथीने भाजपाने याठिकाणी सत्ता स्थापनेचा दावा केला होता. अविश्वास ठराव पारित झाल्यानंतर भाजपाकडून सत्ता स्थापनेसाठी हालचाली सुरू करण्यात आल्या यात भारतीय जनता पार्टीचे जिल्हा समन्वयक नितीन भुतडा यांची खेळी झाली. यामध्ये काँग्रेसच्या नगरसेवक जयश्री संजय नरवाडे यांना नपं अध्यक्षपद दिल्या जाण्याची जोरदार चर्चा राजकीय गोटात सुरू असतानाच भाजपाने आपल्या पक्षाच्या नगरसेवक रंजना आडे यांचा अध्यक्षपदाचा उमेदवारी अर्ज दाखल करून सर्वांनाच धक्का दिला.
 
 
यावेळी काँग्रेसकडूनसुद्धा नगरसेवक रूपाली कोल्हेकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आला होता. उपविभागीय अधिकारी सखाराम मुळे उपस्थितीत निवडणूक प्रकि‘या पार पडली. यामध्ये भाजपाच्या रंजना आडे, सुरेश नरवाडे, गजानन साबळे, आशा बावणे, शिवसेनेचे नप उपाध्यक्ष प्रमोद भरवाडे, रामराव नरवाडे, विशाल पांडे, करुणा नारायण शिरबिरे, सुनीता डाखोरे या पाच व काँग्रेसच्या परवेज सुरय्या, जयश्री संजय नरवाडे, जयश्री इंगोले अशा १२ नगरसेवकांनी रंजना आडे यांच्या बाजूने मतदान केले. काँग्रेसच्या उमेदवार कोल्हेकर यांना केवळ काँग‘ेसच्या शैलेश कोपरकर, महेश पाटील, सुरेखा विनोद कोपरकर, रूपाली कोल्हेकर या चार व अपक्ष सुनंदा दिलीप कोपरकर अशा ५ नगरसेवकांनी मतदान केले. यात रंजना आडे यांचा बहुमताने विजय झाला.
 
 
Mahagaon Nagar Panchayat President: Ranjana Ade  यावेळी भाजपाचे नितीन भुतडा, माजी तालुकाध्यक्ष दीपक आडे, डॉ. इरफान कुंदन, जिल्हा उपाध्यक्ष अजय पुरोहित, आमदार विजय खडसे, शिवसेना स्वीकृत नगरसेवक सुजित ठाकूर, माजी नगरसेवक नारायण शिरबिरे, मंडळ अध्यक्ष योगेश वाजपेयी, श्रीधर भवानकर, महागाव शहराध्यक्ष निलेश नरवाडे, माजी तालुकाध्यक्ष संजय पाटे, विलास शेबे, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष जयश्री सुनील राठोड, बुद्धिजीवी सेल जिल्हाध्यक्ष मुकुंद पांडे, विलास कवाने, रामजी राठोड, संतोष पडळकर, सुरेश आव्हाड यांनी नप अध्यक्ष रंजना आडे यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.
काँग्रेस नगरसेवकांनी झुगारला व्हिप
महागाव नगर पंचायतीतील सत्ताधारी काँग्रेसच्या अंतर्गत बंडाळीमुळे काँग्रेसच्या नगरसेवक परवेज सुरय्या, जयश्री नरवाडे, जयश्री इंगोले यांनी बंडाचा झेंडा हाती घेत सुरुवातीला अध्यक्षांवरील अविश्वास प्रस्तावाचा व्हिप झुगारला. त्यानंतर नपं अध्यक्ष निवडीकरिता काँग्रेस गटनेते शैलेश यांनी पक्षाच्या सर्व नगरसेवकांसाठी व्हिप जारी केला होता. परंतु यावेळीसुद्धा काँग्रेसच्या या तीन नगरसेवकांनी पक्षाचा व्हिप फाट्यावर मारून विरोधात मतदान केले. त्यामुळे पक्ष त्यांच्यावर काय कारवाई करणार, याकडे शहरवासींचे लक्ष लागले आहे.
शहराचा सर्वांगीण विकास हेच ध्येय
सत्ता हस्तगत करणे हे आमचे धोरण नसून सत्ताधार्‍यांनी शहरातील कामांची लावलेली वाट पाहून भविष्यात शहराचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही शहर विकासाची तळमळ असलेल्या नगरसेवकांना सोबत घेऊन या ठिकाणी सत्ता स्थापन केली. भविष्यात शहरातील अनेक विकास कामांसाठी कोट्यवधी रुपयांचा निधी आणून ही विकासकामे पूर्ण करून शहराचा कायापालट केला जाईल.
नितीन भुतडा
भाजपा जिल्हा समन्वयक