मालेगाव,
Malegaon Nagar Panchayat: Budget नगरपंचायतच्या सन २०२५ -२६ चा सुधारित व २०२६-२७ या आगामी वर्षाचा ६१ कोटी ४५ लाख रुपयांचा अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. मालेगाव न.पं. येथे २७ फेब्रुवारी रोजी नगराध्यक्ष ओम खुरसडे यांच्या अध्यक्षतेखाली विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी कार्यालयीन अधीक्षक व कर निरीक्षक यांच्या उपस्थितीमध्ये नगरपंचायतचे सन २०२५-२६ चे सुधारित व २०२६-२७ चे आगामी वर्षाचे अंदाजपत्रकास मंजुरी प्रदान करण्यात आली.
Malegaon Nagar Panchayat: Budget नगरपंचायत स्थायी समितीमध्ये मंजुरी मिळाल्याप्रमाणे विशेष सभेमध्ये अर्थसंकल्प मंजूर करण्यात आला. यामध्ये दिव्यांग बांधवाकरिता महिला व बालकल्याण विकास करिता आर्थिक दुबळ कल्याण घटकाकरिता क्रीडा, साहित्य करिता व विशेष पाणीपुरवठा व स्वच्छता विभागाकरिता तसेच मालेगाव नगरपंचायत नवीन इमारती करिता तरतूद करण्यात आली आहे. याचप्रमाणे इतर आवश्यक कामाकरिता तरतूद करण्यात आली. सदर सभेस मालेगाव नगरपंचायतचे उपाध्यक्ष, सभापती व सर्व नगरसेवक, नगरपंचायत चे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.