साहित्यिकांचे ऋण फेडण्यासाठी मराठीला जपा : वखरे

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
हिंगणघाट, 
अतिशय प्राचीन असलेली मराठी संस्कृती व भाषा जपणे ही Maraṭhi bhasha gaurav din मराठी भाषा गौरव दिनी थोर साहित्यिक कुसुमाग्रज उर्फ वि. वा. शिरवाडकर यांना खरी आदरांजली ठरेल. त्याचवेळी संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम, नामदेव आदी संत व मराठी भाषा कोष निर्माण करणारे छत्रपती शिवराय, स्वातंत्र्यवीर सावरकर, भारतरत्न डॉ, आंबेडकर यांचे ऋण फेडण्याची सुवर्णसंधी प्राप्त करण्यासाठी मराठी भाषा जपा असे आवाहन तरुण भारताचे तालुका प्रतिनिधी सतीश वखरे यांनी केले.
 
 
vakhare
 
स्थानिक राज्य परिवहन मंडळाच्या आगारात आयोजित Maraṭhi bhasha gaurav din  मराठी राजभाषा गौरव दिन कार्यक्रमात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी आगार व्यवस्थापक गौतम शेंडे होते. व्यासपीठावर आगार लेखाकार अरविंद शहारे, राहुल ढगे, सचिन कांबळे, वाहतूक निरीक्षक ममता सोनोने यांची उपस्थिती होती. पुढे वखरे यांनी अकराव्या शतकापासून मराठी भाषेच्या गौरवशाली इतिहासापासून आजच्या मराठी भाषेच्या विकासावर प्रकाश टाकला. छत्रपती शिवराय यांनी मराठीवर आलेले डच, पोर्तुगील, मोगल यांचे भाषेवर झालेले आक्रमण दूर करण्यासाठी पहिल्यांदा मराठी शब्दकोषाची निर्मिती केली. त्यानंतरच्या काळात स्वा. सावरकरांनी पुन्हा एकवार या भाषेला असंख्य मराठी शब्द देऊन ही भाषा समृद्ध केली. परंतु, आजची पिढी ही मराठीतून बोलणे कमीपणाचे समजत आहे. त्यामुळे संत ज्ञानेश्वरांनी म्हटल्याप्रमाणे अमृतालाही पैजेत जिंकणार्‍या मराठीची स्वतःच्या घरी होतं असलेल्या दुरावस्थेबद्दल खन्त व्यक्त करीत प्रत्येकाने घरीदारीं मराठीतूनच व्यवहार करण्याचे आवाहन त्यांनी केले.
 
 
Maraṭhi bhasha gaurav din  गौतम शेंडे यांनी जगात सहा हजार भाषा असून यात मराठीचा दहावा क्रमांक आहे. तर भारतात मराठी बोलणार्‍यांची संख्या तीन नंबरवर आहे. मराठी संस्कृती टिकविण्यासाठी मराठीचा अधिकाधिक वापर करण्याचे आवाहन त्यांनी केले. यावेळी मे. सूर्यासंन्स फॉर्मर कंपनीचे अध्यक्ष सचिन कांबळे, वाहतूक निरीक्षक ममता सोनोने यांनी मार्गदर्शन केले. संचालन सय्यद आसिफ अली यांनी केले. आभार हितेंद्र हेमके यांनी मानले.