नंदनवन वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
नागपूर,
Nandanvan Library नागपूर येथील नंदनवन सार्वजनिक वाचनालयात मराठी भाषा गौरव दिन उत्साहात साजरा करण्यात आला. शिवजयंतीनिमित्त आयोजित विशेष कार्यक्रमात शिवछत्रपती राज्य युवा पुरस्कारार्थी तथा नंदनवन ग्रंथालयाचे अध्यक्ष डॉ. शांतीदास लुंगे यांनी प्रमुख मार्गदर्शन केले.
 
Nandanvan Library
 
“आजच्या युवाशक्तीने मराठी भाषेचा दैनंदिन वापर करून तिचा अभिमान बाळगावा,” असे आवाहन त्यांनी आपल्या भाषणात केले. कार्यक्रमाची सुरुवात विद्या देवता माता सरस्वती यांच्या प्रतिमेचे पूजन व माल्यार्पण करून करण्यात आली. यावेळी मराठी ग्रंथ प्रदर्शनीचेही आयोजन करण्यात आले होते. Nandanvan Library कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन स्मिता उराडे, ग्रंथपाल यांनी केले, तर आभार प्रदर्शन सोपान धारगावे यांनी केले. कार्यक्रमास सतीश कुकडे, जयप्रकाश फुटाणे, नरेश राऊत, सोनाली सोनारे, किरण ढोबळे, मनीषा निखाडे, विलास मानकर, चंदू सूर्यवंशी आदी पदाधिकारी, वाचक व विद्यार्थी उपस्थित होते.
सौजन्य: शांतीदास लुंगे, संपर्क मित्र