हिंदू धर्म आचरणात आणावा : ओमप्रकाश पांडे

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
विशाल हिंदू संमेलन

नेर, 
संघशताब्दीनिमित्त सर्वत्र विशाल हिंदू संमेलनांचे आयोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून येथील छत्रपती दुर्गोत्सव मंडळ यांच्या सहकार्याने छत्रपती दुर्गोत्सव शिवाजीनगर येथे विशाल हिंदू संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी व्यासपीठावर ग्रामगीताचार्य Omprakash Pandey ओमप्रकाश पांडे व जिल्हा भारतीय प्रमुख मिलिंद देशकर ह्यांची उपस्थिती होती.
 
 
ner
 
दीपप्रज्वलनाने सोहळ्याला सुरुवात झाली. यावेळी आशीर्वचनपर बोलताना Omprakash Pandey  ओमप्रकाश पांडे यांनी, हिंदू धर्म ही एक विशाल विचारधारा असून आपण खर्‍या अर्थाने हिंदू धर्म आचरणात आणावा, असे सांगितले. त्यासाठी त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज व राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी धर्मासाठी केलेल्या महान कार्याचे दाखले दिले. मिलिंद यांनी आपल्या प्रेरक उदबोधनात संघाला अभिप्रेत असलेल्या पंच परिवर्तन मधील पाचही घटकांचा सविस्तर उलगडा करून सांगितला. आजच्या काळात पंचपरिवर्तन कसे महत्त्वाचे आहे हे पटवून दिले. या संमेलनासाठी अभिंद्र कणसे, सागर किन्हीकर, नीलेश काटकर व छत्रपती दुर्गोत्सव मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी परीश्रम घेतले. या संमेलनाला मोठ्या प्रमाणात महिला व पुरुष श्रोत्यांची होती. भारतमातेची आरती व महाप्रसादाने संमेलनाची सांगता झाली.