पंच परिवर्तनांनीच देशाचा विकास : दाणी

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
वर्धा, 
पर्यावरण, स्वदेशी, कुटुंब प्रबोधन, नागरिक कर्तव्य आणि सामाजिक समरसता या पाचही बिंदूंचा सखोल विचार करणे अत्यंत आवश्यक असून या पाच बिंदूंच्या विचारांनीच समाजाचा विकास करण्याकरिता विचार करणे अत्यंत गरजेचे आहे असे प्रतिपादन रा. स्व. संघाचे प्रांत शारीरिक प्रमुख Prashant Dani प्रशांत दाणी यांनी केले. स्थानिक सकल हिंदू समाज आयोजन समिती, बिरसा मुंडा वस्ती यांच्या वतीने गुरुवार २६ रोजी साने गुरुजीनगर येथील साई मंदिराच्या परिसरात सायंकाळी ६ वाजता आयोजित विशाल हिंदू संमेलनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी हभप कल्पना पडोळे होत्या. प्रमुख अतिथी म्हणून विनोद महाराज जाधव (आळंदीकर भागवताचार्य कीर्तनकार, नाचणगाव) तर प्रमुख वते म्हणून रा. स्व. संघाचे प्रांत शारीरिक प्रमुख प्रशांत दाणी उपस्थित होते.
 
 
dani
 
दाणी यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षा बद्दल माहिती दिली व देशासमोर असलेल्या विविध समस्यांवर प्रकाश टाकला. अनेक वर्षांच्या परकीय दास्यतेमुळे सत्व विसरलेल्या समाजाचे प्रबोधन करणे या हिंदू संमेलनाचे उद्देश आहे. सर्व जात, पंथ, संप्रदाय, भाषा आणि भेद विसरून सकल हिंदू समाज हा एक सूत्रबद्ध करण्यासाठी भारतभर हिंदू संमेलनाचे आयोजन सुरू असल्याचे त्यांनी सांगितले.
 
 
Prashant Dani  हभप कल्पना पडोळे यांनी हिंदू समाज आता जागृत झाला नाही तर परिस्थिती हाताबाहेर जाईल व त्याचे कश्मीर सारखे परिणाम आपल्या येथेही भोगावे लागतील असे सांगितले. हिंदू समाज बहुसंख्य असूनही त्याच्या हिताची काळजी करावी लागते अशी खंत व्यत केली. समाजकंटक आपल्या फायद्याच्या गोष्टीच आपल्या ग्रंथातून किंवा संस्कृतीतून काढून घेतात व त्याचा उपयोग हिंदू धर्माच्या दुष्प्रचारासाठी करतात असे त्या म्हणाल्या. विनोद महाराज जाधव आळंदीकर यांनी हिंदू समाज जर एकवटला तर त्याचा परिणाम जगाला दिसेल व त्यांनी ऑपरेशन सिंदूर बद्दल झालेल्या गोष्टींबद्दलही उलगडा केला. कार्यक्रमाला परिसरातील सगळे नागरिक वृंद माता-भगिनी उपस्थित होते. संचालन व आभार प्रदर्शन धनंजय कुकडे यांनी केले. कार्यक्रमाला नगर संघ चालक डॉ. प्रसाद देशमुख, नगरसेवक सचिन होले, गोपी त्रिवेदी यांचे विशेष योगदान कार्यक्रमाला लाभले. कार्यक्रमापूर्वी वस्तीमध्ये स्कूटर रॅली काढून वातावरण निर्मिती करण्यात आली.