यवतमाळ राष्ट्रसेविका समिती लेखिका स्नेहमिलन सोहळा आज

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
यवतमाळ
'Rashtra Sevika Samiti' राष्ट्रसेविका समिती यवतमाळद्वारे नगरातून निघणार्‍या ‘आभा’ या हस्तलिखिताच्या रौप्य महोत्सवी सोहळ्याचे रविवार, १ मार्च रोजी आयोजन करण्यात आले आहे. यावेळी लेखिका स्नेहमिलन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. या सोहळ्यानिमित्त रविवार, १ मार्च रोजी सकाळी ८.३० ते ९.३० दरम्यान ग‘ंथदिंडी काढण्यात येणार आहे. सकाळी १०.३० ते १२ दरम्यान सोहळा असून यावेळी वैजयंती वडनेरकर यांच्या कविता संग‘हाचे विमोचन करण्यात येणार आहे. कार्यक‘माला मु‘य अतिथी म्हणून दूरदर्शन कलाकार गौरी अशोक थोरात उपस्थित राहणार आहे. प्रमुख वक्ता म्हणून राष्ट्रसेविका समितीच्या अखिल भारतीय सहकार्यवाहिका चित्रा जोशी उपस्थित राहणार आहेत. ‘साहित्यातून समाज प्रबोधन’ हा त्यांच्या मार्गदर्शनाचा विषय आहे.
 
 
seveikdsi
 
'Rashtra Sevika Samiti'  दुपारच्या पहिल्या सत्रात १२.०५ १२.४५ काव्यवाचन, १.४५ ते २.३० या दुसर्‍या सत्रात कथाकथन, २.४५ ते २.३० या तिसर्‍या सत्रात ‘आभा’ हस्तलिखिताच्या लेखिकांचा सत्कार आयाजित केला आहे. समारोपीय सत्रात मु‘य अतिथी म्हणून वैदिक रुद्र मंडळ संचालक अनिता महाबळ उपस्थित राहणार आहेत. तर ‘राष्ट्र सर्वोपरी’ या विषयावर नागपूरच्या मेधाविनी मंडळाच्या शिल्पा नंदनपवार मार्गदर्शन करणार आहेत. लेखिका स्नेहमिलन सोहळ्यात उपस्थित राहण्याचे आवाहन आभा हस्तलिखिताच्या संपादक वृषाली मानेकर, विभाग कार्यवाहिका जयश्री तांबुळे व नगर कार्यवाहिका डॉ. किशोरी केळापुरे यांनी केले आहे.