तात्काळ पंचनामा करून मदतीच्या दिल्या सूचना
बुलढाणा,
शहरातील प्रभाग क्रमांक १० मधील इंदिरा नगर परिसरात शुक्रवारी अचानक लागलेल्या आगीत चार घरांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. या घटनेची माहिती मिळताच Sanjay Gaikwad आ. संजय गायकवाड यांनी तात्काळ दखल घेत अग्निशमन दलास घटनास्थळी पोहचण्याच्या सूचना दिल्या. त्यानंतर त्यांनी स्वतः घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला.
Sanjay Gaikwad आगीत संतोष आवटे व राजेंद्र तायडे, शेख शाहिद शेख वाहिद, मुद्दशीर कुरेशी यांच्या घरांचे मोठे नुकसान झाले असून घरातील साहित्य, कपडे व इतर जीवनावश्यक वस्तू जळून खाक झाल्याची माहिती मिळाली आहे. सुदैवाने कोणतीही जीवितहानी झालेली नाही मात्र आर्थिक नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे. घटनास्थळी उपस्थित राहून आ. संजय गायकवाड यांनी संबंधित महसूल व नगरपालिका अधिकार्यांना त्वरित पंचनामा करण्याचे निर्देश दिले. नुकसानग्रस्त कुटुंबांना शासनाकडून जास्तीत जास्त आर्थिक मदत मिळवून देण्यासाठी आवश्यक प्रस्ताव सादर करण्यास सांगितले. यावेळी नगरसेवक पती योगेश परसे, शिवसेना युवासेनेचे पदाधिकारी तसेच स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.