काही तासांत ‘द केरळ स्टोरी 2’ सिनेमाने छापले इतके कोटी

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
मुंबई
The Kerala Story 2 वादग्रस्त सिनेमा द केरल स्टोरी 2: गोस बियॉन्ड 27 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित झाला आहे. सिनेमाचे प्रदर्शन अनेक वादांनी गाजवले होते, पण अखेर उच्च न्यायालयाच्या परवानगीनंतर तो प्रेक्षकांच्या भेटीला आला. रिपोर्ट्सनुसार, सिनेमाने पहिल्या दिवशी सुमारे 1.6 ते 1.8 कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे. मात्र, निर्मात्यांकडून अद्याप याबाबत अधिकृत आकडे जाहीर केलेले नाहीत.
 

The Kerala Story 2, The Kerala Story 2 
हा सिनेमा 2023 मध्ये प्रदर्शित झालेल्या द केरळ स्टोरी सिनेमाचा सिक्वल आहे. पहिल्या सिनेमाने पहिल्या दिवशी सुमारे 6–8 कोटी रुपयांचा व्यवसाय केला होता, त्यामुळे सिक्वलच्या ओपनिंगची तुलना पहिल्या चित्रपटाशी केली जात आहे. यामुळे आता सिनेमाने किती कोटींपर्यंत कमाई करेल, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.‘द केरल स्टोरी 2’ सुमारे 30 कोटी रुपयांच्या बजेटमध्ये तयार करण्यात आला असून, बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई झाल्यास तो सुरक्षित आर्थिक क्षेत्रात येऊ शकेल. सिनेमा प्रदर्शित होण्याअगोदर केरळ उच्च न्यायालयाने त्याच्या प्रदर्शनावर 15 दिवसांची स्थगिती आणली होती. न्यायालयाने म्हटले होते की, सिनेमामुळे सार्वजनिक सुव्यवस्था आणि सांप्रदायिक सौहार्दाला धोका निर्माण होऊ शकतो. मात्र, उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने नंतर ही स्थगिती हटवली आणि सिनेमाला प्रदर्शित होण्यास परवानगी दिली.
सिनेमात उल्का The Kerala Story 2 गुप्ता, ऐश्वर्या ओझा आणि अदिति भाटिया यांनी प्रमुख भूमिका साकारल्या आहेत. कथा तीन मुलींच्या आयुष्याभोवती फिरते, ज्यामध्ये प्रेमाचं खोटं नाटक, फसवून लग्न आणि जबरदस्तीने धर्मांतर यांसारख्या मुद्द्यांना अधोरेखीत करण्यात आलं आहे.सिनेमा प्रदर्शित झाल्यानंतर येत्या काही दिवसांत त्याची बॉक्स ऑफिसवरची स्थिती आणि कमाई किती कोटींपर्यंत पोहचते, हे चित्रपटसृष्टीतील तज्ज्ञ आणि चाहत्यांसाठी महत्त्वाचा मुद्दा ठरणार आहे.