अप्पर कोषागार अधिकार्‍यासह अन्य दोनजण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या जाळ्यात

    दिनांक :28-Feb-2026
Total Views |
बुलढाणा, 
anti corruption department पोलीस विभागातून सेवानिवृत्ता इालेल्या मृत वडिलांची अप्पर कोषागार अधिकारी यांचे सह कनिष्ठ लेखापाल व कनिष्ठ लिपिक या तिघांना १५ हजार रुपयाची लाच स्वीकारताना बुलढाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले आहे या तिघांविरोधातही लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
 
 

anti corruption  
 
 
शेगाव येथील सेवानिवृत्त कर्मचारी हे मे २०२२ मध्ये सेवानिवृत्त झाले. त्यानंतर त्यांचे मे २०२५ मध्ये निधन झाले. पतीची पेन्शन पत्नीचे नावे करण्यासाठी ऑटोंबर २०२५ मध्ये अर्ज केला होता. तेव्हापासून दि.२६ फेब्रुवारी पर्यंतही पेन्शन केस मंजूर करण्यात आली नाही. तब्बल पाच महिन्याच्या कालावधीमध्ये पेन्शनच्या फाईलमध्ये विविध त्रुटी काढून पेन्शन फाईल परत पाठविण्यात येत होती. मुलाने यासंदर्भात जिल्हा कोषागार अधिकारी केसशी संबंधित असलेल्या लिपिकाशी दि. २६ फेब्रुवारी रोजी संपर्क केला यावेळी संबंधित लिपिकाने मुलाकडे २० हजार रुपयाची लाचेची मागणी केली सेवानिवृत्त मृत पोलीस कर्मचार्‍यांच्या मुलाने बुलढाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे दि. २६ फेब्रुवारी रोजी संपर्क करून सविस्तर तक्रार दिली. बुलढाणा लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सरकारी पंचा समक्ष दि. २६ फेब्रुवारी रोजी पडताळणी केली. यावेळी लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाल्यानंतर २७ फेब्रुवारी रोजी जिल्हा कोषागार कार्यालयात अप्पर कोषागार अधिकारी प्रवीण मोंढे कनिष्ठ लेखापाल विनोद घट्टे लिपीक जीवन काळे या एकत्रितपणे सेवानिवृत्त मृत पोलीस कर्मचारी यांच्या मुलाकडून पंधरा हजार रुपयाची लाच स्वीकारली. याचवेळी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या बुलढाणा पथकाने या तिघांनाही लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. या तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.anti corruption department कारवाई ही पोलीस अधीक्षक बापू बांगर, अप्पर पोलीस अधिक्षक सचिंद्र शिंदे, पोलीस उपअधिक्षक अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, अमरावती यांच्या आदेशान्वये भागोजी चोरमले अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, बुलढाणा यांचे मार्गदर्शनाखाली रमेश पवार, पोलीस निरीक्षक विलास गुसिंगे, पोलीस निरीक्षक व सफौ शाम भांगे, पोहेकों प्रविण बैरागी, राजेद्र क्षिरसागर, सुभाष मांटे, दिपक जाधव, अमोल झिने, पोना जगदीश पवार, पोकॉ. गजानन गाल्डे, रंजीत व्यवहारे, शैलेश सोनवणे, लक्ष्मीकांत इंगळे, रतन गिरी, मपोहेकॉ. अनिता वारंगणे, मपोकों, स्वाती वाणी, चापोहेका नितीन शेटे, अर्शद शेख सर्व अ‍ॅन्टी करप्शन ब्युरो, बुलडाणा यांनी पार पाडली.