तामिडनाडू
Vijay Tamil actor साऊथचा सुपरस्टार आणि राजकारणी विजय याच्या वैयक्तिक आयुष्याला सध्या मोठा गदारोळ लागला आहे. रिपोर्ट्सनुसार, त्याची पत्नी संगीता सोरनलिंगम यांनी तामिळनाडूतील चेंगलपट्टू कोर्टात घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला आहे. या निर्णयामुळे 26 वर्षांनी एकत्र असलेल्या या जोडप्याचा संसार मोडण्याच्या मार्गावर असल्याचे समजते.
विजय आणि संगीता यांचा विवाह 25 ऑगस्ट 1999 रोजी पार पडला होता. त्यांच्या नात्यातून दोन मुलांचा जन्म झाला – जेसन संजय आणि दिव्या साशा. या जोडप्याचे वैयक्तिक जीवन नेहमीच मिडियापासून दूर ठेवले गेलेले आहे. तरीही या घटनेनंतर चाहत्यांमध्ये मोठा धक्का बसला आहे. दोन दशकांपेक्षा अधिक काळ एकत्र असलेल्या या जोडप्याच्या नात्यात अचानक दुरावा का आला, हे प्रश्न अनेकांच्या मनात उठत आहेत.संगीता सोरनलिंगम यांचा जन्म युनायटेड किंग्डममध्ये झाला. तिचे कुटुंब श्रीलंकेच्या तमिळ समुदायाशी निगडीत असून तिचे वडील प्रसिद्ध तमिळ उद्योगपती होते, जे नंतर यूकेमध्ये स्थायिक झाले. विवाहानंतरही संगीता नेहमीच सार्वजनिक आयुष्यापासून दूर राहिली, स्टारडमच्या आकर्षणापासून स्वतःला दूर ठेवले.
अभिनेता विजय Vijay Tamil actor आणि संगीताची भेट ही एका चित्रपटाच्या कथेसारखी होती. विजयचा ‘पूवे उनाक्कागा चित्रपट सुपरहिट झाल्यावर लंडनमध्ये राहणारी संगीता चेन्नईला त्याचे अभिनंदन करण्यासाठी आली होती. चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान त्यांची ओळख झाली, तिच्या साधेपणाने विजय प्रभावित झाला आणि त्याने तिच्या कुटुंबाशी भेट घडवली. दोन्ही कुटुंबांच्या सहमतीनंतर विवाहाचा निर्णय घेतला गेला. धर्म भिन्न असताना देखील दोघांनी हिंदू पद्धतीने लग्न केले आणि चेन्नईत भव्य रिसेप्शनही आयोजित केले.विवाहानंतर संगीता नेहमीच लो-प्रोफाइल जीवन जगली. सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये ती क्वचितच दिसायची. ‘वारिसु’ चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्चसारख्या मोठ्या कार्यक्रमात तिच्या अनुपस्थितीमुळे यापूर्वी अफवा पसरल्या होत्या, परंतु त्या नंतर फेटाळून लावण्यात आल्या. आई म्हणून तिने मुलांच्या संगोपनावर लक्ष केंद्रीत केले आणि त्यांना मीडियापासून दूर ठेवले. जेसन आणि दिव्या क्वचितच सार्वजनिक ठिकाणी दिसतात.सध्या विजयचा ‘जन नायगन’ चित्रपट प्रदर्शित होण्याच्या तयारीत आहे. हा त्याचा अभिनय क्षेत्रातील शेवटचा चित्रपट असणार आहे, त्यानंतर तो राजकारणात सक्रिय होणार आहे. विजय तमिळनाडूतल्या तमिलगा वेत्री कझगम या पक्षाच्या माध्यमातून नवीन प्रवास सुरू करेल. मात्र, त्याचा आणि संगीताचा संसार मोडण्याच्या उंबरठ्यावर आहे, आणि चाहत्यांना या घटनेवर अद्याप अधिकृत माहिती नाही.विजय किंवा संगीता पैकी कोणीही अद्याप याबाबत अधिकृत विधान केलेले नाही. त्यामुळे चाहत्यांच्या मनात प्रश्न कायम आहेत – हा त्यांच्या नात्याचा शेवट आहे की भविष्यात काही नवीन ट्विस्ट पाहायला मिळेल?