‘डीजे वाजणार नाही’चा संकल्प
श्रीक्षेत्र माहूर,
येणार्या पवित्र होळी सण आणि रमजान तसेच बाबा सोनापीर उर्सनिमित्य माहूर पोलिस ठाण्यात ठाणेदार देविदास चोपडे यांच्या प्रमुख शांतता समितीची बैठक पार पडली. या बैठकीत यापुढे कुठल्याही सण-उत्सव काळात डीजे वाजणार नाही, असा संकल्प घेण्यात आला. Srikshetra Mahur श्रीक्षेत्र माहूर शहर हे तीर्थक्षेत्राचे ठिकाण असून येथे सण-उत्सवासह जयंती पुण्यतिथी यासह वर्षभर होणार्या यात्रा महोत्सवात मिरवणुका निघत असतात तर लहान थोरांचे वाढदिवसही मोठ्या प्रमाणात साजरे होत असतात.
Srikshetra Mahur या ठिकाणी छोट्या आवाजात डीजेवर गाणे यासह इतर भाषणे वाजविले जात असल्याने अनेक वेळा शांतता कायदा व सुव्यवस्था धोक्यात येण्याचा प्रसंग उद्भवतो. त्यामुळे ठाणेदार देविदास चोपडे यांनी उपस्थितांना डीजे वाजवू नका, असे आवाहन केल्याने, यापुढे डीजे वाजणार नाही, असा संकल्प शांतता समितीच्या बैठकीत करण्यात आला. या बैठकीत सहपोलिस निरीक्षक शरद घोडके, उपनिरीक्षक ब्राह्मण, उपनिरीक्षक संदीप अन्येबोईनवाड, गोपनीय शाखेचे गजानन चव्हाण, राकाँ तालुका अध्यक्ष मेघराज जाधव, पत्रकार नंदकुमार जोशी, पत्रकार वसंत कपाटे, भाजपा नगरसेवक गोपू महामुने, अॅड, जगदीश अडकिने, भाजपाचे अजय पवार, काँग्रेसचे नगरसेवक निसार कुरेशी, सुनील वानखेडे, अर्जुन पवार, संतोष नाईक, पत्रकार इलियास बावाणी, राज ठाकूर, शंकर भालेराव, पवन चव्हाण यांच्यासह उपस्थित होते.