सावरकर विचार हाच देशाचा संजीवन मंत्र

    दिनांक :01-Mar-2026
Total Views |
स्वातंत्र्यवीर सावरकर आत्मर्पण दिन
रामनगर स्थित मंदिरात व्याख्यान

नागपूर,
आजच्या घडीला देशभरात हिंदुत्व विचाराला जे चांगले दिवस आले आहेत, त्याचे श्रेय हे 'Swatantryaveer Savarkar'  स्वातंत्र्यवीर सावरकर यांनी देशात रुजवलेल्या हिंदुत्वाच्या बिजाला आहे. सावरकर विचार हाच देशाला विश्वात बलशाली करून प्रगतीपथावर नेणारा संजीवन मंत्र असल्याचे स्पष्ट प्रतिपादन कवी अनिल शेंडे यांनी केले.
 


savr 
 
पश्चिम नागपूर नागरिक संघाच्या वतीने 'Swatantryaveer Savarkar'  स्वातंत्र्यवीर आत्मर्पण दिनाच्या निमित्ताने रामनगर स्थित राम मंदिरात आयोजित व्याख्यानात ते बोलत होते. क्रांतिकारकांचे कुलपुरुष स्व. सावरकर या विषयावर ते बोलत होते.यावेळी अध्यक्षस्थानी रा. स्व. संघाचे धरमपेठ भाग संघचालक श्याम पत्तरकिने होते. अनिल शेंडे पुढे म्हणाले, सावरकरांनी स्वातंत्र्यासाठी केलेल्या सशस्त्र क्रांतिबरोबरच सामाजिक, राजकीय, साहित्य, इतिहासलेखन, आदि विविध क्षेत्रात केलेल्या अमुलाग्र प्रकाश टाकला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रवि वाघमारे, राजीव काळेले आदींनी परिश्रम घेतले.