ज्येष्ठांसाठी स्मार्ट कार्ड सक्ती रद्द करा

    दिनांक :01-Mar-2026
Total Views |
नागपूर,
senior citizens राज्य शासन व महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन मंडळ यांनी ज्येष्ठ नागरिकांच्या प्रवास सवलतीसाठी लागू केलेल्या ‘NCMC स्मार्ट कार्ड’ सक्तीच्या नियमाबाबत तीव्र नाराजी व्यक्त करत हा निर्णय तात्काळ मागे घ्यावा, अशी मागणी लोकमंच ज्येष्ठ नागरिक मंडळाचे सचिव डॉ. दीपक शेंडेकर यांनी केली आहे. सध्या मंडळाच्या धोरणानुसार ६५ वर्षांवरील पुरुष ज्येष्ठ नागरिकांना ५० टक्के सवलत, तर ७५ वर्षांवरील नागरिकांना ‘अमृत ज्येष्ठ नागरिक योजना’ अंतर्गत मोफत प्रवासाची सुविधा दिली जाते. महिलांनाही विविध सवलती लागू आहेत.
 
nagpur
  
मात्र १ मार्च २०२६ पासून सवलतीचा लाभ घेण्यासाठी NCMC स्मार्ट कार्ड अनिवार्य करण्यात आले आहे. हे कार्ड मिळविण्यासाठी संबंधित डेपोमध्ये जाऊन आधार कार्ड सादर करणे व सुमारे १९९ रुपये (जुन्या कार्डच्या बदल्यात १४९ रुपये) शुल्क भरणे आवश्यक आहे. कार्ड नसल्यास सवलत नाकारली जाणार असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. senior citizens डॉ. शेंडेकर यांनी म्हटले आहे की, अनेक ज्येष्ठ नागरिकांना डेपोमध्ये जाऊन रांगेत उभे राहणे किंवा ठरावीक कालावधीत प्रक्रिया पूर्ण करणे कठीण जाते. शासनाच्या इतर योजनांसाठी आधार कार्ड ग्राह्य धरले जाते, मग या योजनेसाठी स्वतंत्र कार्ड सक्तीचे का, असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. हा नियम तातडीने रद्द करावा, अन्यथा ज्येष्ठ नागरिकांना आंदोलनाचा मार्ग स्वीकारावा लागेल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
सौजन्य: दीपक देशपांडे, संपर्क मित्र