उन्हाचा चटका, उकाडा वाढण्याचा अंदाज
कमाल तापमान ३६.४ अंश सेल्सिअस
नागपूर,
climate change उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला असतानाच, पहाटे गारठा जाणवत आहे.नागपूरचे कमाल तापमान ३६.४ अंश सेल्सिअस तर किमान तापमानाचा पारा १९.६ अंश सेल्सिअस आहे. रविवारी दुपारी उन्हाचा चटका आणि उकाडा होता. अंशतः ढगाळ हवामानामुळे उकाडा त्रासदायक ठरत असून कमाल तापमान सरासरीच्या तुलनेत ३ ते ४ अंशांनी अधिक राहण्याची शक्यता आहे. उन्हाचा चटका आणि उकाडा वाढण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
आर्द्रतेचे बदलणारे स्वरूप
वाढत्या मानवी घडामोडींमुळं कार्बन डाय ऑक्साईड उत्सर्जनाचे प्रमाण वाढले असून, परिणामी तापमानातही वाढ झाली आहे. एखाद्या ठिकाणी अनेक वर्षांपासून असलेली ऊन, वारा, पाऊस, थंडी यांची स्थिती म्हणजे हवामान. या सरासरी हवामानातला बदल म्हणजेच (क्लायमेट चेंज) हवामान बदल होय. हवामान बदलाचे विपरित परिणाम होणार असतील तर तापमान वाढण्यापासून रोखणे काळाची गरज आहे. भारतामध्ये हवामान बदलाचे संकट दिवसेंदिवस गडद होत चालले असून, येणार्या काळात उष्णतेचा कहर अधिक आहे. हवामान बदलामुळे तापमानात वाढ आणि विविध भागांमधील आर्द्रतेचे बदलणारे स्वरूप ही यामागची मुख्य कारणे असल्याचे मत हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ.प्रविण कुमार यांनी दिली आहे.
पारा वाढल्याने उन्हाळ्याची सुरुवात
हवामान तज्ज्ञांच्या मते, या धोक्याशी लढण्यासाठी प्रत्येक क्षेत्रानुसार रणनीती आखण्याची गरज आहे. मार्च महिन्याच्या पहिल्याच दिवशी पारा वाढल्याने उन्हाळ्याची सुरुवात आहे. आगामी दिवसात विदर्भातील नागपूर, अमरावती, अकोला, वाशिम, यवतमाळ, चंद्रपूर, गडचिरोली, बुलढाणामध्ये सर्वाधिक उष्णता जाणवेल. नागपूरचे कमाल तापमान ३५-३८ अंश, किमान २०-२३ अंश राहील. विदर्भात थंडी जवळपास संपली असून आता उन्हाचा तडाखा बसण्यास सुरुवात झाली आहे. त्यामुळे उष्णतेशी संबंधित आजारांपासून सावध राहाण्यचा इशारा डॉक्टरांनी दिला आहे.
पंखे आणि कूलर
climate change सध्या बहुतांश भागात हवामान स्वच्छ आणि कोरडे असून तापमानात वाढ होत असल्याने नागरिकांनी दुपारच्या उन्हात अनावश्यक बाहेर पडणे टाळावे, पुरेसे पाणी पिणे आणि हलक्या कपड्यांचा वापर करावा. हवामानातील हा बदलामुळे पंखे आणि कूलर सुरू झाली आहे.
वातावरणात धुळीचे कण
climate change मुख्यत:मागच्या काही दिवसांपासून वातावरणात सातत्याने बदल होताना दिसत आहे. उन्हाचा आता जाणून लागला आहे. थंडी गायब झाली असून सकाळच्या वेळी थोडासा गारठा जाणवतो. मात्र, नागपुरात प्रदूषणात वाढ झाल्याचे दिसून येते. वातावरणात धुळीचे कण आहेत. वाहन चालविताना अंधूक अंधूक दिसत आहे. वायू प्रदूषण हा गंभीर प्रश्न आहे. या वायू प्रदूषणामुळे हवा इतकी जास्त घातक बनली की, नागरिकांना श्वास घेणेही कठीण मास्क घातल्याशिवाय बाहेर फिरता येणे कठीण झाले आहे. वाढत्या प्रदूषणामुळे नागरिकांच्या आरोग्याच्या गंभीर प्रश्न निर्माण होत आहे. यासोबतच सर्दी, खोकला आणि श्वसनाचा त्रास होत आहे.