पशुपालकांमध्ये मोठी चिंता 26 गुरांचा मृत्यू

    दिनांक :01-Mar-2026
Total Views |
अहिल्यानगर,
cow disease outbreak जिल्ह्यातील दैठणे गुंजाळ या गावात गायींमध्ये आजाराचा प्रादुर्भाव झाल्याने पशुपालकांमध्ये मोठी चिंता पसरली आहे. गेल्या 15 दिवसांत तब्बल 26 गायी मृत्युमुखी पडल्याची माहिती असून, गावातील दुग्ध व्यवसायावर मोठा परिणाम होण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
 

cow disease outbreak 
गावात अंदाजे दीड हजार दूध देणाऱ्या गायी आहेत आणि स्थानिक अर्थव्यवस्था यावर मोठ्या प्रमाणावर अवलंबून असल्यामुळे या आजारामुळे पशुपालक cow disease outbreak आर्थिक संकटात सापडले आहेत. पशुपालकांच्या माहितीनुसार, आजारग्रस्त गायींमध्ये अचानक सुस्त पडणे, जागेवर बसून राहणे, चारापाणी न घेणे, हातपाय खोडणे आणि चार ते पाच दिवसांत मृत्यू अशी लक्षणे दिसत आहेत. काही गायी अचानक गायब होणे किंवा हालचाल न करणे अशीही माहिती ग्रामस्थांकडून मिळाली आहे.पशुपालकांनी प्रशासनाकडे तातडीने हस्तक्षेप करण्याची मागणी केली आहे. मृत गायींचा विमा नसल्यामुळे त्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून, एका गायीची किंमत 70 ते 75 हजार रुपयांपर्यंत असल्याचे सांगितले जाते. ग्रामस्थांची मागणी आहे की, दुधाच्या मागील स्लिपच्या आधारे नुकसान भरपाई द्यावी आणि प्रत्येक मृत गायीसाठी किमान 70 ते 75 हजार रुपयांची मदत जाहीर करावी.शेतकऱ्यांनी तातडीने वैद्यकीय पथक पाठवून लसीकरण, तपासणी व प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली आहे, जेणेकरून उर्वरित जनावरे वाचवता येतील आणि परिसरातील दुग्ध व्यवसाय सुरक्षित राहील.