ऑटो पार्किंगवरून प्राणघातक हल्ला

    दिनांक :01-Mar-2026
Total Views |
वर्धा, 
deadly-attack-from-auto-parking-lot : ऑटो पार्क करण्याच्या कारणातून धारदार शस्त्राने केलेल्या प्राणघातक हल्ल्यात एक जण गंभीर जखमी झाला तर एक जण बचावला. ही घटना रेल्वे स्थानक गेटच्या समोरील भागात शुक्रवारी २७ फेब्रुवारी रोजी घडली.
 
 
jlk
 
इतवारा बाजार येथील शेख शानू शेख जब्बार आणि त्यांचा भाऊ सोनू हे दोघे वर्धा रेल्वे स्थानक ते सेवाग्राम रेल्वे स्थानक असा ऑटो चालवितात. दोघांकडे एकच ऑटो आहे. रेल्वे स्थानक गेटला रंगरंगोटीचे काम सुरू असल्याने रंगरंगोटी करणार्‍यांनी ऑटो दूर करण्यास सांगितले. तेथे ऑटो चालक नसल्याने त्याचा ऑटो रिक्षा चालकाने त्या ठिकाणाहून आत नेला. काही वेळाने जावेदने ऑटो इतरत्र नेल्याच्या कारणातून शिवीगाळ केली.
 
 
त्यावेळी सोनू आणि जावेदमध्ये बाचाबाची झाली होती. वादाबाबत जावेदने पोलिसांत तक्रार केली होती. वादातून शेख जावेद शेख शाकीर, शेख रहिम शेख शाकीर दोघे रा. इतवाजारा बाजार या दोघांनी प्राणघातक हल्ला केला. रहीम याने सोनूवर चाकूने वार केल्याने सोनूला गंभीर दुखापत झाली. दरम्यान, जावेदने केलेला शस्त्राचा वार थोडयात बचावला. त्यानंतर जावेदने शेख शानू शेख जब्बार याच्यावरही शस्त्र मारले. बाजूला झाल्याने ते थोडयात बचावले. याप्रकरणी शेख जावेद शेख शाकीर, शेख रहिम शेख शाकीर या दोघांविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे.