इराणचे सर्वोच्च नेते खामेनेई यांचा मृत्यू; मुलगी-जावयासह कुटुंबातील अनेकांचा दुर्दैवी अंत

    दिनांक :01-Mar-2026
Total Views |
तेहरान, 
irans-supreme-leader-khamenei इराणच्या सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांच्याबाबत मोठी बातमी समोर आली आहे. इराणी सरकारी माध्यमांनी खामेनी यांच्या निधनाची पुष्टी केली असून, त्याच्या कुटुंबातील अनेक सदस्यांसह त्यांच्या मुलगी आणि जावईंचा देखील मृत्यू झाला आहे. इराण सरकारने ४० दिवसांचा सार्वजनिक शोक जाहीर केला आहे आणि ७ दिवसांची सार्वजनिक सुट्टी देण्यात आली आहे.
 
irans-supreme-leader-khamenei
 
इराणी सरकारी दूरचित्रवाणी आणि अधिकृत वृत्तसंस्था आयआरएनएने ८६ वर्षीय खामेनी यांच्या निधनाची माहिती दिली, परंतु मृत्यूचे कारण स्पष्ट केलेले नाही. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी काही तासांपूर्वी सांगितले की खामेनी यांचा मृत्यू अमेरिका-इस्रायली संयुक्त कारवाईत झाला आहे. irans-supreme-leader-khamenei इस्रायल डिफेन्स फोर्सेसने या हल्ल्यात मारल्या गेलेल्या सात वरिष्ठ इराणी संरक्षण नेत्यांची यादी जाहीर केली आहे. यामध्ये अली शामखानी, मोहम्मद पाकपौर, सालेह असादी, मोहम्मद शिराजी, अझीझ नासिरजादेह, हुसेन जबल अमेलियन आणि रेझा मुझफ्फर-निया यांचा समावेश आहे.
खामेनींच्या मृत्यूनंतर इराणमध्ये शोकाची लाट पसरली आहे. इराणी माध्यमांनी म्हटले की, "देशाचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचे निधन झाले आहे." त्यांच्या निधनामुळे देशभर ४० दिवसांचा सार्वजनिक शोक जाहीर केला गेला आहे. अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प यांनी सोशल मीडियावर पोस्ट करत म्हटले की, "इतिहासातील सर्वात क्रूर व्यक्तींपैकी एक असलेल्या खामेनीचा मृत्यू झाला आहे. irans-supreme-leader-khamenei हा न्याय फक्त इराणच्या लोकांसाठी नाही, तर खामेनी आणि त्याच्या रक्तपिपासू टोळीने मारलेल्या किंवा त्रास दिलेल्या सर्व लोकांसाठी आहे."