वर्धा,
dhulivandan-in-wardha : राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांच्या पुण्यतिथी महोत्सवानिमित्त श्री गुरुदेव सेवा मंडळ, धूलिवंदन उत्सव समिती आणि सेवाभावी आध्यात्मिक, सामाजिक संस्था यांच्या वतीने अनिष्ट रूढींना फाटा देत सामाजिक जनजागृती करणार्या संस्कारक्षम अभिनव धूलिवंदन सोहळ्याचे आयोजन मंगळवार ३ रोजी सकाळी ७ वाजता मातोश्री सभागृह येथे करण्यात आले आहे. यानिमित्ताने शहरातून प्रभात फेरी काढण्यात येणार आहे.

समाज प्रबोधनात्मक ३१ वर्षाची परंपरा असलेल्या अभिनव धुलिवंदनाची सुरुवात पहाटे ४.३० ते ५.१५ ग्रामसफाई आणि जमलेल्या कचर्याची होळी तसेच सकाळी ५.१५ ते ६ वाजता सामुदायिक ध्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. त्यानंतर प्रभात फेरीची सुरुवात मातोश्री सभागृह येथून सकाळी ७ वाजता होईल. आर्वी चौक राष्ट्रसंत तुकडोजी महाराज चौक, म्हाडा कॉलनी रोड, लालबाग गणेश मंदिर, ज्ञानेश्वर महाराज मंदिर, गणेश किराणा, गरीब शहा वली चौक, प्रार्थना मंदिर (टेकडी) हनुमान मंदिर, ग्रापं पिपरी (मेघे), सुविधा केंद्र, नर्मदेश्वर मंदिर, गिरीपेठ, विठ्ठल रुख्मिणी मंदिर, हनुमान गड, कारला चौक, स्वागत कॉलनी रोड, हनुमान मंदिर, राष्ट्रीय सामाजिक विद्यालय, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज उद्यान या भागातून ही प्रभात फेरी जाईल. समारोपीय कार्यक्रम सकाळी ११ वाजता होईल. पं. अजित कडकडे यांचे शिष्य अमित लांडगे यांच्या अभंगवाणीचा कार्यक्रम प्रभात फेरीनंतर होईल.