मध्यपूर्व देशांमध्ये तणावपूर्ण पार्श्वभूमीवर शासन सतर्क

    दिनांक :01-Mar-2026
Total Views |
नागपूर,
मध्यपूर्व व परिसरातील काही देशांमध्ये निर्माण झालेल्या तणावपूर्ण प्रादेशिक परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारच्या संबंधित दूतावासांनी तेथे वास्तव्यास असलेल्या भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा अ‍ॅडव्हायझरी जारी केली आहे. अनुषंगाने पॅलेस्टाईन (रामल्ला), कतार (दोहा), सौदी अरेबिया (रियाध), इस्रायल (तेल अवीव), इराण (तेहरान), इराक (बगदाद) कुवैत, बाहरीन, मस्कत, जॉर्डन आणि संयुक्त अरब अमिरात (अबू धाबी) येथे वास्तव्यास असलेल्या सर्व भारतीय नागरिकांनी सतर्क राहावे, अनावश्यक हालचाल टाळावी आणि स्थानिक प्रशासन तसेच भारतीय दूतावासांनी दिलेल्या सूचनांचे पालन करावे, असे District Collector Dr. Itankar जिल्हाधिकारी डॉ इटनकर यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे आवाहन केले आहे.
 
 
itan
 
District Collector Dr. Itankar  आपत्कालीन परिस्थितीत कुणाला आवश्यकता भासल्यास संबंधित देशातील भारतीय दूतावासांच्या अहोरात्र सुरू असलेल्या हेल्पलाइन क्रमांकांवर संपर्क साधावा. दूतावास नियमितपणे परिस्थितीवर लक्ष ठेवून आवश्यक सूचना जारी करत आहेत. महाराष्ट्र शासनाच्या वतीने परदेशातील नागरिकांनी शांतता व संयम राखावा, अधिकृत सूचनांचे पालन करावे. गरज पडल्यास तात्काळ दूतावासाशी संपर्क साधावा, असे प्रसिद्धीपत्रकात नमूद केले आहे.