नागपूर,
Neelima Vaikule प्रतापनगर शिक्षण संस्थेद्वारा संचालित प्रतापनगर मराठी शाळेत सहाय्यक शिक्षिका नीलिमा वायकुळे यांना ३३ वर्षांच्या समर्पित सेवेनंतर भावपूर्ण निरोप देण्यात आला. शनिवारी शाळेच्या सभागृहात आयोजित छोटेखानी कार्यक्रमात उपाध्यक्ष शंकर पहाडे, सचिव अनुपमा नाफडे, पदाधिकारी सुनील गावपांडे, प्रमोद कोठीवाले, मुख्याध्यापिका सुनंदा गौरकर, मुख्याध्यापक श्रावण सुरकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात माता सरस्वतीच्या प्रतिमेला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली.

नीलिमा वायकुळे यांचे सत्कार शाल, श्रीफळ, पुष्प बुके व सन्मानपत्र देऊन केला गेला. सहकारी शिक्षकांनी त्यांच्या कार्य व वर्तनाचे कौतुक केले व भविष्याच्या आयुष्यासाठी शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे अध्यक्ष शंकर पहाडे यांनी वायकुळे यांनी शाळेसाठी केलेली सेवा शाश्वत स्मरणात राहणार असल्याचे व्यक्त केले. Neelima Vaikule नीलिमा वायकुळे यांनी शाळेबाबत अनुभव सांगितले व नोकरीचे ठिकाण हे कुटुंबासारखे होते असे सांगत सर्वांचे आभार मानले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रियंका धुवे यांनी केले तर आभार प्रदर्शन अंजली बोरकर यांनी केले.
कार्यक्रमास नीलिमा वायकुळे यांचे कुटुंबीय तसेच शिक्षक विजय वानखडे, मनोज पवार, विशाल चव्हाण, तेजराम बांगडकर, पवन नेटे, वंदना काळे, नंदिनी सावसाकडे, दीपाली उमाठे, रंजना बोरकर, मंजुषा सुखदेवे, जयश्री पांडे, वैदेही दिवाण, विद्या हत्तीमारे, सुप्रिया खोत, नीतू चव्हाण, मोनाली मोहोड, रेणुका येल्लेवार, बकुल तुंबडे आदी उपस्थित होते.
सौजन्य: विजय दाणी, संपर्क मित्र