वर्धा,
Hinganghat tiger death, हिंगणघाट तालुयाच्या सेलू मुरपाड परिसरातील कॅनलमध्ये ३१ डिसेंबरला वाघिणीचा मृतदेह सापडला. ही वाघिण पाहुणपणासाठी वर्धा जिल्ह्यात आली असावी, असा अंदाज वनविभागाचा असला तरी तिच्या मृत्यूचं कोडं उलगडण्यात अद्यापही वनविभागाला यश आलेले नाही. काही नमुने वनविभागाने जनुकीय विश्लेषणासाठी हैद्राबाद येथील प्रयोगशाळेत पाठविले. पण, त्याचा अहवाल अद्यापही वनविभागाला प्राप्त झालेला नाही.
हिंगणघाट तालुयाच्या सेलू मुरपाड परिसरातील कॅनलमध्ये ३ ते ४ वर्ष वयोगटातील वाघिणीचा मृतदेह ३१ डिसेंबर २०२५ ला आढळून आल्याने एकच खळबळ उडाली होती. या घटनेची माहिती मिळाल्यावर प्रादेशिक वनविभागाच्या अधिकार्यांनी मृत वाघिणीचा पाण्याबाहेर काढले. शिवाय पंचनाम्याअंति त्री-सदस्यीय पशुवैद्यकीय अधिकार्यांच्या चमूद्वारे वाघिणीच्या मृतदेहाचे शवविच्छेदन केले. संबंधित वाघिणीचा मृत्यू नेमका कशाने झाला याबाबतची ठोस माहिती प्राथमिक शवविच्छेदन अहवालात पशुवैद्यकीय अधिकार्यांनी नमुद केलेले नसल्याचे सांगितले जात आहे. त्या वाघिणीची शिकार केल्यावर तिचा मृतदेह कॅनलमध्ये पुरावा नष्ट करण्याच्या उद्देशाने फेकण्यात आल्याचा अंदाज वनविभागाच्या अधिका-याकडून व्यत करीत काही नमुने जनुकीय विश्लेषणासाठी हैद्राबाद येथील प्रयोग शाळेत पाठविण्यात आले आहे. पण, तीन महिन्यांचा कालावधी लोटला असताना अहवाल प्राप्त झालेला नाही. त्यामुळे त्या पाहुण्या वाघिणीच्या मृत्यूचे गुढ उलगडलेले नाही.