मध्य पूर्वेतील तणावाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र सरकारचा सल्लागार

शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन

    दिनांक :01-Mar-2026
Total Views |
मुंबई, 
maharashtra-governments-advisor मध्य पूर्व आणि त्याच्या आसपासच्या प्रदेशात वाढलेल्या तणावाच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने तेथील भारतीय नागरिकांसाठी सुरक्षा सूचना जारी केली आहे. विविध देशांतील भारतीय दूतावासांनी आपल्या नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन केले असून अनावश्यक हालचाली टाळाव्यात, स्थानिक प्रशासन व दूतावासांनी दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोर पालन करावे, असे स्पष्ट केले आहे. कोणतीही आपत्कालीन परिस्थिती उद्भवल्यास संबंधित दूतावासाशी तात्काळ संपर्क साधावा, असेही सांगण्यात आले आहे.
 
maharashtra-governments-advisor
 
महाराष्ट्र सरकारनेही परदेशात वास्तव्यास असलेल्या राज्यातील नागरिकांना शांतता आणि संयम राखण्याचे आवाहन केले आहे. केंद्र सरकार आणि संबंधित दूतावासांशी सातत्याने संपर्क ठेवून परिस्थितीवर लक्ष ठेवले जात असल्याचे राज्य सरकारने नमूद केले आहे. maharashtra-governments-advisor या सूचनेनुसार पॅलेस्टाईनमधील रामल्ला, कतारमधील दोहा, सौदी अरेबियातील रियाध, इस्रायलमधील तेल अवीव, इराणमधील तेहरान, इराकमधील बगदाद, कुवेत, बहरीन, ओमानमधील मस्कत, जॉर्डन तसेच संयुक्त अरब अमिरातीतील अबू धाबी येथे राहणाऱ्या भारतीय नागरिकांनी विशेष काळजी घ्यावी, असे सांगण्यात आले आहे.
दूतावासांनी चोवीस तास कार्यरत असलेल्या मदत क्रमांकांद्वारे सहाय्य उपलब्ध करून दिले असून परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवले जात आहे. maharashtra-governments-advisor सरकारने पुन्हा एकदा नागरिकांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचा, केवळ अधिकृत माहितीवर अवलंबून राहण्याचा आणि आवश्यकतेनुसार दूतावासाशी त्वरित संपर्क साधण्याचा सल्ला दिला आहे.