नागपूर,
National Science Day श्रीमती दादीबाई देशमुख हिंद मुलींची शाळा यांच्या सुंदराबाई साने सभागृहात राष्ट्रीय विज्ञान दिन उत्साहात साजरा करण्यात आला.या प्रसंगी शिवाजी सायन्स कॉलेज येथील विद्यार्थिनी कुमारी शगुफ्ता, लावण्या, सिमरन तसेच अमित यांनी प्रा. सारंग धोटे यांच्या मार्गदर्शनाखाली तयार केलेली ‘वॉटर टेस्टिंग किट’ प्रत्यक्ष प्रयोग करून दाखवली.
या प्रयोगांद्वारे पाण्याची गुणवत्ता कशी तपासली जाते याचे प्रात्यक्षिक विद्यार्थिनींना समजावून सांगण्यात आले.कार्यक्रमास शाळेच्या मुख्याध्यापिका माया बामनोटे National Science Day, उपमुख्याध्यापक सुबोध अष्टीकर उपस्थित होते. विद्यार्थिनींनी या उपक्रमाचा उत्साहाने सहभाग घेतला.
सौजन्य: माया बमनोटे,संपर्क मित्र