नागपूर,
दिल्ली येथे झालेल्या जुनिअर नॅशनल स्कूल गेम्समध्ये Nishika Gokhe निशिका गोखे हिने महाराष्ट्र राज्याचे प्रतिनिधित्व करून रौप्य पदक पटकाविले. निशिका हिने सेवासदन ज्युनियर कॉलेजमध्ये असताना नॅशनल स्कूल गेम्समध्ये महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करून सलग तीनही वर्षी पदक पटकविले. खेलो इंडिया युथ निवडीकरिता देशभरातील एकूण ४० संघातून अंतिम तीन खेळाडूंमधून तिची निवड झाली. निशिकाच्या यशाबद्दल सेवासदन शिक्षण संस्थेच्या अध्यक्षा कांचन गडकरी, सचिव वासंती भागवत, उपाध्यक्ष बापू भागवत, तसेच ज्युनियर कॉलेजचे प्राचार्य अजय चव्हाण यांनी तिचे कौतूक केले आहे.