पैठणमध्ये मध्यरात्री गोंधळ! डान्स बारसमोर गोळीबार

    दिनांक :01-Mar-2026
Total Views |
छत्रपती संभाजीनगर
Paithan Thapti Tanda incident, पैठण तालुक्यातील थापटी तांडा येथील ‘कुलस्वामिनी कला केंद्र’समोर शनिवारी रात्री सुमारे ११ वाजताच्या सुमारास मद्यधुंद व्यक्तींनी घातलेला गोंधळ परिसरात तणाव निर्माण करणारा ठरला. रस्त्यावर पायी जाणाऱ्या रजापूर येथील एका तरुणावर किरकोळ कारणावरून मारहाण झाली, तर एका व्यक्तीने हवेत गोळीबार केला, ज्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले.
 

Paithan Thapti Tanda incident, 
घटनेची माहिती गावात पोहोचताच रजापूर येथील सुमारे ३०० ग्रामस्थांचा संतप्त जमाव कला केंद्रासमोर जमा झाला. त्यांनी केंद्राचा मुख्य लोखंडी गेट तोडून आत प्रवेश केला आणि फर्निचर, सीसीटीव्ही कॅमेरे, टेबल तसेच अन्य विद्युत साहित्याची मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली. पार्किंगमध्ये उभ्या असलेल्या अंदाजे १०–१२ चारचाकी वाहनांच्या काचे फोडल्या गेल्या. या दगडफेकीत ३–४ जण जखमी झाले.
अचानक उसळलेल्या गोंधळामुळे नृत्य कार्यक्रम पाहण्यासाठी आलेल्या प्रेक्षकांमध्ये दहशत पसरली. केंद्रातील नृत्यांगनांनी कार्यक्रम तात्काळ थांबवला आणि सुरक्षिततेसाठी स्वतःला एका खोलीत बंद केले, ज्यामुळे संभाव्य अपघात टळला.
सदर कला केंद्र Paithan Thapti Tanda incident, अनधिकृतपणे चालत असल्याने आडूळ परिसरातील सुमारे २० गावांच्या ग्रामस्थांनी ते कायमस्वरूपी बंद करावे, अशी मागणी प्रशासनाकडे केली होती. मंत्रालयापर्यंत निवेदन दिल्यानंतरही कारवाई न झाल्याने नागरिकांमध्ये नाराजी वाढली होती. घटनेची माहिती मिळताच पाचोड पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली. सध्या परिसरात तणावपूर्ण शांतता आहे, तर पाचोड पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याची प्रक्रिया सुरू आहे.