खामेनी यांच्या हत्येविरोधात जम्मू-काश्मीर आणि लखनौमध्ये आंदोलन

    दिनांक :01-Mar-2026
Total Views |
श्रीनगर, 
protests-for-khamene-jammu-kashmir इराणविरुद्ध अमेरिका आणि इस्रायलने केलेल्या संयुक्त कारवाईत इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामेनी यांचा मृत्यू झाल्यानंतर देशात आणि परदेशात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. जम्मू आणि काश्मीरमधील शिया मुस्लिम समाजाने या घटनेचा निषेध करत रस्त्यावर उतरून आंदोलने केली. श्रीनगरमधील लाल चौक परिसरात मोठ्या संख्येने नागरिक जमले आणि खामेनी यांच्या हत्येविरोधात घोषणाबाजी केली. या आंदोलनांचे चित्रफीतही समोर आली असून त्यामध्ये लोकांचा संताप स्पष्टपणे दिसून येत आहे.
 
protests-for-khamene-jammu-kashmir
 
रामबन येथेही शिया समाजाने निषेध व्यक्त केला. protests-for-khamene-jammu-kashmir तेथेही नागरिकांनी रस्त्यावर येत या कारवाईचा तीव्र शब्दांत विरोध नोंदवला. उत्तर प्रदेशातील लखनौ येथे शिया धर्मगुरू मौलाना सय्यद कल्बे जवाद यांनीही या घटनेबाबत भूमिका मांडली. त्यांनी जाहीर केले की रात्री आठ वाजता मेणबत्त्या प्रज्वलित करून शांतता मिरवणूक काढण्यात येईल. त्यांनी तीन दिवसांचा शोक जाहीर करण्याचे आवाहन केले तसेच दुकाने आणि व्यावसायिक आस्थापने स्वेच्छेने बंद ठेवण्याचे सांगितले. कोणावरही दबाव टाकू नये, असेही त्यांनी स्पष्ट केले. खमेनी यांचा मृत्यू मानवतेसाठी मोठी हानी असल्याचे त्यांनी म्हटले.
दरम्यान, इस्रायल आणि अमेरिकेच्या संयुक्त कारवाईत खामेनी यांच्यासह त्यांच्या कुटुंबातील अनेक सदस्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. protests-for-khamene-jammu-kashmir या घटनेनंतर इराणमध्ये प्रचंड खळबळ उडाली असून जबाबदारांना धडा शिकवण्याचा इशारा इराणी नेतृत्वाने दिला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया देताना खमेनी यांचा मृत्यू हा इराणी जनतेसाठी आपल्या देशात बदल घडवण्याची संधी असल्याचे म्हटले आहे. त्यांनी असा दावा केला की इराणमधील काही सुरक्षा दलातील सदस्य लढण्यास इच्छुक नाहीत आणि ते अमेरिकेकडून संरक्षणाची अपेक्षा करत आहेत. तसेच त्यांनी इशारा देत सांगितले की सध्या संधी दिली जाऊ शकते, मात्र नंतर कठोर परिणामांना सामोरे जावे लागेल.