महापालिकेने तेरा महिन्यांत जप्त केले ५ हजार किलो प्लास्टिक

    दिनांक :01-Mar-2026
Total Views |
पुणे
Pune Municipal Corporation plastic seizure, राज्य शासनाने ५० मायक्रॉनपेक्षा कमी जाडीच्या प्लास्टिक पिशव्या आणि थर्माकोल वापरावर बंदी घालून पर्यावरणाच्या संरक्षणासाठी कडक उपाययोजना सुरू केली आहे. त्याच अनुषंगाने पुणे महापालिकेने जानेवारी २०२५ ते जानेवारी २०२६ या तेरा महिन्यांच्या कालावधीत १ हजार ४०८ जणांवर कारवाई करून एकूण ५,१६८ किलो प्लास्टिक जप्त केले आहे. या कारवाईत सात लाख २४ हजार ५०० रुपये दंड वसूल करण्यात आले आहेत.
 

Pune Municipal Corporation plastic seizure, 
प्लास्टिक पिशव्यांवर बंदी राज्यात २०१८ पासूनच आहे. महापालिकेनेही ‘यूज ॲण्ड थ्रो’ प्लास्टिक आणि थर्माकोलच्या वस्तूंवर नियमितपणे कारवाई सुरू ठेवली आहे. महापालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन विभाग, आरोग्य निरीक्षक आणि कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून ही कारवाई राबवली गेली. तथापि, प्लास्टिक वापराच्या तुलनेत कारवाईचे प्रमाण कमी असल्याचे दिसून येते, ज्यामुळे महापालिकेच्या कारवाईचा वेग थंडावल्याचे स्पष्ट होते.
 
 
प्लास्टिक कचरा निर्मूलनासाठी Pune Municipal Corporation plastic seizure, महापालिकेने माजी आयुक्त विक्रम कुमार यांच्या नेतृत्वाखाली स्पर्धाही आयोजित केली होती. या स्पर्धेत पुणेकरांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला आणि कमी कालावधीत ३,२४८ किलो प्लास्टिक बाटल्या जमा केल्या. स्पर्धेतील विजेत्यांना कमिन्स इंडिया या संस्थेच्या सहकार्याने स्मार्टफोन, स्मार्टवॉच, इलेक्ट्रिक बाईक यांसारखी बक्षिसे देण्यात आली होती.महिन्यानुसार जप्त केलेल्या प्लास्टिकचे प्रमाण पुढीलप्रमाणे आहे: जानेवारी २०२५ – ६५९ किलो, फेब्रुवारी – २८० किलो, मार्च – २८८ किलो, एप्रिल – २०२ किलो, मे – २४२ किलो, जून – १२०.९ किलो, जुलै – ५८५.५५ किलो, ऑगस्ट – ३३२.३ किलो, सप्टेंबर – ३७९.५ किलो, ऑक्टोबर – ४१९.५ किलो, नोव्हेंबर – २१३.५ किलो, डिसेंबर – २५७५ किलो, जानेवारी २०२६ – १०८.५ किलो.महापालिकेच्या प्रशासनाने पर्यावरण संरक्षणाच्या दृष्टीने प्लास्टिक वापरावर कारवाई चालू ठेवण्याचे आश्वासन दिले आहे.