पुण्यातील ८४ विद्यार्थी आणि शिक्षक इस्रायल–इराण युद्धामुळे दुबईमध्ये अडकले

    दिनांक :01-Mar-2026
Total Views |
पुणे
East Israel Iran conflict impact मध्य पूर्वेतील इस्रायल आणि इराणदरम्यान सुरू असलेल्या युद्धजन्य परिस्थितीचा फटका पुण्यातील विद्यार्थ्यांना बसला आहे. ताथवडे येथील नामांकित इंदिरा इन्स्टिट्यूट ऑफ स्कूल ऑफ बिझनेस
चे ८० विद्यार्थी आणि ४ शिक्षक, एकूण ८४ जण सध्या दुबईमध्ये अडकले आहेत. हवाई मार्ग तात्पुरते बंद झाल्याने त्यांच्या परतीचा प्रवास खोळंबला आहे.
 

Pune students stranded Dubai, Indira Institute of School of Business study visit, Middle East Israel Iran conflict impact, 
सर्व विद्यार्थी एका विशेष 'स्टडी व्हिजिट'साठी दुबईला गेले होते. नियोजित वेळापत्रकानुसार, ते शनिवारी आणि रविवारी दोन टप्प्यांत भारतात परतणार होते. मात्र, आखाती देशांमधील वाढत्या तणावामुळे अनेक आंतरराष्ट्रीय उड्डाणे रद्द करण्यात आली, परिणामी विद्यार्थ्यांना दुबईमध्ये थांबावे East Israel Iran conflict impact लागले आहे.महाविद्यालय प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार, सर्व विद्यार्थी आणि शिक्षक दुबईच्या मध्य भागात सुरक्षित आहेत. पालकांनी घाबरून न जाता विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेबाबत विश्वास ठेवावा, असे आवाहन महाविद्यालयाकडून करण्यात आले आहे. तसेच, दुबईतील भारतीय दूतावासाचे अधिकारी या विद्यार्थ्यांच्या संपर्कात असून त्यांच्या निवासाची योग्य व्यवस्था करण्यात आली आहे.