नागपूर,
R. S. Mundle English School आर. एस. मुंडले इंग्लिश स्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालय, समर्थ नगर येथे मराठी राजभाषा दिन मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रार्थनेने झाली. प्रस्तावना व पुष्पार्चनानंतर मान्यवरांचे स्वागत करण्यात आले.विद्यार्थिनी श्रावणी महिंद्रकर हिने मराठी भाषेचे महत्त्व, तिची समृद्ध परंपरा आणि जतन करण्याची गरज याविषयी प्रभावी भाषण केले. विद्यार्थ्यांनी सादर केलेले नाटक हे कार्यक्रमाचे मुख्य आकर्षण ठरले. नाटकाचे लेखन पूर्वा मेनजोगे यांनी केले असून दिग्दर्शन गौरी देशपांडे यांनी केले. विद्यार्थ्यांची तयारी करून घेण्यासाठी स्वाती सिंग यांनी विशेष परिश्रम घेतले.मराठी शब्द व म्हणींवर आधारित विविध खेळांचे आयोजन करण्यात आले होते. विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवून कार्यक्रमात रंगत आणली.

सुत्रसंचालन दीपाली बापट यांनी केले, तर आभार प्रदर्शन साक्षी पोलके यांनी व्यक्त केले. मुख्याध्यापिका लखबीर कौर सुरी यांचे मार्गदर्शन लाभले. R. S. Mundle English School पर्यवेक्षिकाअमृता नगरकर, मराठी विभाग प्रमुख संगीता तांबोळी, कार्यक्रम प्रमुख सोनाली भागवत व प्रार्थना विभाग प्रमुख सोनाली कठाळे यांचे सहकार्य लाभले.
सौजन्य:प्रीती लांबे,संपर्क मित्र