सेलू रंगात न्हाऊन निघाले; उसळली खरेदीची धूम

    दिनांक :01-Mar-2026
Total Views |
सेलू, 
saleu-holi-shopping : धुळवळीच्या पृष्ठभूमीवर शहरातील बाजारपेठेत रंगोत्सवाची चाहूल लागली असून रंग-पिचकारींच्या खरेदीसाठी नागरिकांची गर्दी उसळली आहे. मुख्य बाजारपेठ, आठवडी बाजार व चौकांमध्ये रंग, गुलाल आणि विविध प्रकारच्या पिचकार्‍यांनी बाजार सजला आहे.
 
 
holi
 
लहान मुलांसाठी कार्टून व आकर्षक आकारांच्या पिचकार्‍या तर तरुणांसाठी आधुनिक डिझाइनच्या व मोठ्या क्षमतेच्या पिचकार्‍यांची मागणी दिसून येत आहे. याशिवाय सुगंधी गुलाल, नैसर्गिक व पर्यावरणपूरक रंगांनाही ग्राहकांची पसंती आहे. सकाळपासून संध्याकाळपर्यंत बाजारपेठेत वर्दळ वाढलेली असून सणाच्या निमित्ताने आर्थिक उलाढालही चांगली होत असल्याचे चित्र आहे.
 
 
दरम्यान, धुळवळ आनंदात साजरी करताना सुरक्षितता, स्वच्छता आणि पर्यावरणाची काळजी घ्यावी, असे आवाहन करण्यात येत आहे. रंगोत्सवाच्या स्वागतासाठी सेलू शहर रंगांच्या उत्साहात पूर्णपणे न्हाऊन निघाले आहे